किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश नांदेड यांची किनवट अभिवक्ता संघास प्रशासकीय भेट..

किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथे शिवनी पासून ते किनवट तालुक्यातील खंबाळापर्यंत तसेच माहूर मधील चिचखेड पासून तर रुई केरोळीपर्यंतचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच सर्व नागरिकांना न्याय हा सोयीचा होण्यासाठी किनवट येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची मागणी होत असल्याकारणाने आता सर्वच स्तरातून चळवळ उभारल्या जात आहे. तसेच त्याचाच एक भाग म्हणून अभिव्यक्त संघ किनवट यांनी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश नांदेड श्री ना.वी. नावेकर यांना दिनांक 8/12/2022 रोजी ते किनवट येथे प्रशासकीय भेटी निमित्त आले असता त्यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय उभारण्यासाठी विनंती केली त्यावेळी सन्माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश नांदेड यांनी ही बाब मंजूर होईल या दिशेने आपण सर्वांना काम करायला पाहिजे तसेच माझी ज्या ज्या वेळी मदत लागेल त्यावेळेस मी समोर येऊन कायदेशीर मदत करण्यास किंबहुना न्याय सुकर होण्यास माझी नेहमी तत्परता राहील अशी ग्वाही दिली तसेच न्यायालयात तीन वर्षापेक्षा जास्त जुनी प्रकरणी प्रलंबित राहू नाही यासाठी आपण एक नवीन पॅटर्न निर्माण केला पाहिजे अशी सूचना अभिवक्ता संघास सन्माननीय साहेबांनी केली तसेच विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपण किनवट /माहूर तालुक्यात न्याय प्रस्थापित करता येतो या दृष्टीने काम करायला हरकत काहीच नाही अशी माहिती सन्माननीय साहेबांनी अभिवक्ता संघास दिली यावेळेस अभिवक्ता संघाचे अध्यक्ष श्री ॲड. अरविंद चव्हाण यांनी प्रखर भाषेमध्ये किनवट/ माहूर तालुक्यातील वकिलाच्या समस्या तसेच पक्ष काराच्या समस्या सांगितल्या किनवट वरून नांदेड दीडशे किलोमीटर आहे तर खंबाळल्यापासून नांदेडचे अंतर हे दोनशे किलोमीटरच्या जवळपास आहे हे अंतर तर आहेच परंतु पक्षकाराला जर एखाद्या केस मध्ये नांदेड येथे जायचे असेल तर त्याला कमीत कमी दोन दिवस लागतात त्यामुळेच आम्हाला अतिरिक्त सत्र न्यायालय देण्यात यावे अशी विनंती अध्यक्ष साहेबांनी केली. तसेच सदर मागणी राजकीय क्षेत्रातून, आर्थिक क्षेत्रातून, शैक्षणिक क्षेत्रातून, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून किंबहुना सर्वच स्तरातून शासनाकडे आंदोलन उभे करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या आंतरिक इच्छेमुळे जनमत निर्माण तयार झालेआहे. तसेच सन्माननीय प्रबंधक उच्च न्यायालय मुंबई हे किनवट येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय उभारण्यासाठी ज्या ज्या बाबीची पूर्तता करायला सांगेल त्या सर्व बाबीची पूर्तता किनवट /माहूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पूर्तता करण्यास तयार आहे ही बाब श्री ॲड विलास शामीले (सुर्यवंशी) यांनी सन्माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश यांना आवर्जून सांगितली. या अगोदरही स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्व ठराव हे दिले होते ही बाब वरिष्ठ विधीज्ञ श्री एस डी राठोड यांनी सांगितली. वर्तमान परिस्थितीमध्ये नांदेड आणि किनवट याचे अंतर हे दीडशे किलोमीटर पेक्षा जास्त असल्यामुळे सत्य बाब ही सत्तेच असते त्यामुळे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय उभारणी म्हणजे किनवट जिल्हा निर्मितीची सुरुवात होणे आहे तसेच सर्वसामान्य नागरिकाला न्याय सुकर होईल अशी परिस्थिती निर्माण करणे आहे राजकीय क्षेत्रातून लढा उभारण्याची गरज आहे असे सर्वसामान्य जनतेचे मत आहे यावेळेस माहूर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष श्री ॲड कांबळे साहेब किनवट अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड श्री अरविंद चव्हाण उपाध्यक्ष ॲड टी एच कुरेशी सचिव श्री पंकज गावंडे ॲड एस डी राठोड ॲडताजने साहेब ॲड काजी साहेब ॲड वैद्य साहेब ॲड उदय चव्हाण साहेब. ॲड काळे साहेब ॲड किशोर मुनेश्वर साहेब तसेच अभिवक्ता संघाचे सर्वच पदाधिकारी तथा वरिष्ठविधीज्ञ तथा विधी ज्ञ हे उपस्थित होते..

60 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.