सीटूच्या घरेलू कामगार नोंदणी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध मागण्याचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन
नांदेड : सीटू संलग्न घर कामगार संघटनेच्या घरेलू कामगारांनी दि. एक जून रोजी नोंदणी व नूतनिकरण करून घेण्यास सुरवात केली असून शेकडो महिलांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त श्री सय्यद मोहसीन यांना देण्यात आले.
निवेनामध्ये प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. कार्यकाळ संपलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव शासनास तातडीने पाठविण्यात यावा. संघटनेच्या वतीने देण्यात आलेले अर्ज स्वीकारण्यात यावेत. नूतनिकरण व नोंदणी करण्यास उदासीनता दाखविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. राज्य व केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व सवलती कामगारांना देण्यात याव्यात. कामगार कार्यालयात येणाऱ्या घरेलू कामगार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोहार्दपूर्ण वागणूक देण्यात यावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेच्या अध्यक्षा कॉ. करवंदा गायकवाड आणि सरचिटणीस कॉ.लता गायकवाड यांनी केले.
आंदोलनास मार्गदर्शन करण्यासाठी सीटूच्या जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार व जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड तथा युनियनचे कार्याध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड आदी पुढारी उपस्थित होते.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ.सुंदरबाई वाहूळकर, कॉ.जयराज गायकवाड, कॉ. मारोती केंद्रे, कॉ. मुकेश आंबटवार, कॉ.सुभाषचंद्र गजभारे, कॉ.गंगाधर खुणे आदींनी परिश्रम घेतले.
सीटू स्थापना दिनाच्या निमित्ताने महात्मा जोतिबा फुले पुतळा ते कामगार कार्यालय मोर्चा काढण्यात येणार होता परंतु शासन आपल्यादारी कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे नांदेड मध्ये येणार असल्याचे शासनाच्या वतीने जिल्हा प्रशासनास कळविण्यात आले असल्यामुळे मोर्चाची परवानगी पोलीस प्रशासनाने नाकरण्यात आली होती.
त्यामुळे मोर्चा व घेराव आंदोलन रद्द करण्यात आले आहे.
परंतु शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांनी तीव्र घोषणा बाजी करीत उद्योग भवन परिसर दणानून सोडला होता.
===