अखेर रेल्वेचे उप ठेकेदार लोंढे आणि व्यवस्थापक रवींद्र परनाटे यांच्यावर अट्रॉसिटी व फसवणूकीचे गुन्हे दाखल
*७ महिन्यापासून संघर्ष आणि ४७ दिवस आंदोलन – माकप*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.13.श्री जगदेव इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.कंपनीला नांदेड रेल्वे स्टेशन येथे रेलगाडीचे डब्बे स्वछ करण्याचे (कोच क्लिनींग)टेंडर मिळालेले आहे.उप ठेकेदार मिलिंद जनार्धन लोंढे यांच्या नावे करार असून व्यवस्थापक रवींद्र प्रभूदास परनाटे हेच सर्वेसर्वा आहेत व काम पाहतात.
मागील अनेक महिन्यापासून स्वच्छता कंत्राटी कामगार म्हणून जयराज केरबाजी गायकवाड, गोपीप्रसाद गायकवाड,सुभाषचंद्र गजभारे,पंढरी बुरुडे, ज्ञानेश्वर खडसे,विश्व्जीत गजभारे सर्व दलित काम करतात.
यापैकी काहीजण महाविद्यालयीन शिक्षण घेणारे असून नांदेड येथील नामांकित महाविद्यालया मध्ये शिक्षण घेत आहेत.
ते सर्व जन देशातील सर्वात मोठी कामगार संघटना म्हणून परिचित असलेल्या सीटू कामगार संघटनेचे सभासद आहेत. त्यांना पगार आणि भविष्य निर्वाह निधी देण्यात यावा म्हणून आणि कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून उपरोक्त सर्वांचे बँक खाते पंजाब नॅशनल अँड सिंध बँक शाखा महावीर चौक नांदेड येथे काढण्यात आले आहेत.कंत्राटदार आणि पिएनबी बँकेचे प्रेमभावनेचे संबंध असल्यामुळे तेथेच सर्व कंत्राटी कामगारांचे बँक खाते काढले आहेत.
श्री मिलिंद लोंढे आणि श्री.रवींद्र परनाटे यांनी खाते काढले खरे परंतु बँक पासबुक आणि एटीएम कार्ड पासबुक धारकांना दिलेच नाही.
बेकायदेशीररित्या बँक पासबुक आणि एटीएम कार्ड स्वतः जवळ ठेऊन घेतले आणि परस्पर कामगारांच्या बँक खात्यातून रक्कम उचलून घेतली.
तक्रारदार कॉ.जयराज गायकवाड यांनी हा प्रकार थांबावा म्हणून आपले एटीएम कार्ड बंद करण्यासाठी दि.२२ सप्टेंबर २०२२ रोजी बँक व्यवस्थापक यांना रीतसर अर्ज देऊन एटीएम कार्ड बंद करावे आणि नवीन एटीएम कार्ड देण्यात यावे अशी मागणी केली होती. परंतु पीएनबी बँकेने एटीएम कार्ड बंद केले नाही.किंबहुना कामगारांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे देखील उचलून घेण्यात आले आहेत.
कामगारांचे सोषण करून लूट करणारी टोळी नांदेड मध्ये सक्रिय असून तपास अधिकाऱ्यांनी योग्य तपास केल्यास रॅकेट उघडकीस येण्यास वेळ लागणार नाही.
वजीराबाद पोलिसांनी समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि कामगारांना पगार देण्यात यावा असा सल्ला मिलिंद लोंढे व रवींद्र परनाटे यांना दिला होता परंतु त्या सल्ल्याला न जुमानता दोघेही आरोपी ठाम राहिले आहेत.
दि.२९ डिसेंबर २०२२ रोजी केलेल्या कामाची मजुरी किंवा बॉण्ड वर करार करून देतो म्हणून महापालिके जवळील दुरसंचार कार्यालयाजवळ जयराज गायकवाड आणि इतर कामगारांना बोलावून घेतले आणि जातीवाचक शिवीगाळ केली तसेच तुला आणि तुझे काका गंगाधर गायकवाड यांना गुंड लावून जीवे मारतो अशी धमकी दिली तसेच पोलीस स्थानकात खोटे गुन्हे दाखल करतो म्हणून धमकवण्यात आले आहे.
या आशयाची फिर्याद वाजीराबाद पोलीस स्थानकात कॉ.जयराज गायकवाड यांनी यापूर्वीच दिली होती परंतु गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
दि.२३ फेब्रुवारी पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,सीटू आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले व तब्बल सात महिने संघर्ष आणि ४७ दिवस अखंड आंदोलन केल्यानंतर मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत आणि अप्पर जिल्हाधिकारी बोरगावकर यांनी कडक सूचना दिल्या नंतर वाजीराबाद पोलीस स्थानकात प्रथम खबर क्रमांक ०१०५ अधिनियम भारतीय दंड संहिता कलम ४२०,५०४,५०६ आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ ३(१) (r)(s) अट्रॉसिटी कायदा नुसार मिलिंद जनार्धन लोंढे आणि रवींद्र प्रभुदास परनाटे यांच्या विरुद्ध वाजीराबाद पोलीस स्थानकात दि.१३ एप्रिल रोजी रात्री १:१६ वाजता गुन्हे दाखल करून उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेन जगदेवराव देशमुख यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न
येवढा कालावधी आंदोलन आणि उपोषण केल्यावर एफआयआर मध्ये जयराज ऐवजी जयराम झाल्याने दुरुस्ती साठी वेगळे निवेदन पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक पो.स्टे.वजीरबाद यांना देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांचे आभार माकप च्या वतीने मानले असून आदेशाचे पालन व्हावे म्हणून तीन दिवस स्थगती देऊन राहिलेल्या मागण्यासाठी दि.१७ एप्रिल पासून निदर्शने आणि धरणे आंदोलन पुनःच सुरु करण्यात येईल अशी नोटीस माकप चे सचिव कॉ. गंगाधर गायकवाड यांनी लेखी स्वरूपात दिली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ.उज्वला पडलवार,कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.श्याम सरोदे, कॉ.लता गायकवाड, कॉ.मारोती केंद्रे,कॉ.गोपीप्रसाद गायकवाड,कॉ.जयराज गायकवाड कॉ.सुभासचंद्र गजभारे,कॉ.सोनाजो कांबळे करीत आहेत.अशी माहिती
कॉ.गंगाधर गायकवाड,
सचिव:मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,नांदेड.यांनी आमच्या नांदेड जिल्हा प्रतिनिधी संजीवकुमार गायकवाड यांना बोलताना दिली आहे.