आदिवासी लोकांना निकृष्ट दर्जाचे खावटी धान्य वाटप
किनवट/प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तालुका किनवट तर्फे मौजे कमठालागाव येथे दि.२२ जानेवारी २०२२ रोजी ठींक ११ वाजून ५५ मी .शबरी आदिवासी महामडळ मालवाहतुक गाडीतुन आलेला खावटी माल कमठाला गावातील आदिवासी समाजाच्या लोकांना आधार कार्ड घेऊन वाटप करण्यात आले.
यात लोकांना निकुष्टदरर्जाचा व सडालेला माल पुवठा केला गेला. असी लेखी तक्रार भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी सेवक जितेंद्र अ . कुलसंगे यानी लेखी तक्रार आदिवासी मंत्री महाराष्ट्र मा.ना.के ,सी, पाडवी व आदिवासी आयुक्त मंत्रालय, आमदार. मा भीमरावजी केराम , खा .मा हेंमत पाटील याना साहय्यक उप जिल्हा अधिकारी याच्या मार्फत तक्रार दाखल केली गेली आहे .पुरवठा निकुष्ट दर्जाचा करणाऱ्या विरुद्ध पोलीस ,फोजदारी गुन्हा नोद करून कार्यवाही करावी व जे दोषी आहेत त्याच्यावर सेवा समाप्त करावी असे जितेंन्द्र अ . कुलसंगे यानी निवेदनात तक्रार केले आहे .