माणिकराव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.17.प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही माणिकराव ठाकरे माजी प्रदेश अध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा माजी गृहराज्यमंत्री व पालकमंत्री नांदेड यांचा वाढदिवस शुक्रवार, दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता कुसुमताई सभागृह,नांदेड येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग,प्रतिमा पॅरामेडिकल कॉलेज श्रीनगर नांदेड, माणिकराव ठाकरे मित्र मंडळ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री मा.आ.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
या शिबिरात नेत्र तपासणी व निःशुल्क चष्मेवाटप करण्यात येणार आहेत.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सत्कारमूर्ती माणिकराव ठाकरे यांचे अभिष्टचिंतन करून सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण राज्यमंत्री डी.पी. सावंत,माजी आ.वसंतराव चव्हाण,आंतरराष्ट्रीय कृषी तज्ज्ञ मुंबई साईनाथ हाडोळे पाटील, महापौर जयश्रीताई पावडे,माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा,काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर,स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, नगरसेवक बालाजी जाधव,राजू पाटील काळे,यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याप्रसंगी भारतीय मानव कल्याण महासमिती नांदेडच्या पदाधिकार्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहेत.तसेच प्रतिमा पॅरामेडिकल कॉलेज श्रीनगर नांदेड येथील कोविड-19 लॉकडाऊनमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या प्राध्यापक,कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच पॅरामेडिकलच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी कृषीतज्ज्ञ साईनाथ हाडोळे पाटील यांचे शेतीवर मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी उपाध्यक्ष अॅड.जे.पी.पाटील, माणिकराव ठाकरे मित्र मंडळाचे अध्यक्ष केशव मालेवार,सचिव तथा स्वीय सहाय्यक माजी गृहराज्यमंत्री, पालकमंत्री नांदेड शिवसांब स्वामी व प्रतिमा पॅरामेडिकल कॉलेज श्रीनगर नांदेडचे संस्थापक अध्यक्ष डॉ.लक्ष्मणराव वाडेवाले यांनी केले आहे.