घोटी येथिल ठक्करबाबा योजने अंतर्गत निधी मध्ये गैरव्यव्हार प्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल करा..
किनवट (तालुका प्रतिनिधी)
मा. आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी साहेब, आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय, किनवट यांच्या कडे मौजे घोटी येथील राजकीय नेतृत्व श्री राजू सुरोशे यांनी मौजे घोटी ता. किनवट येथिल ठक्करबाबा योजने अंतर्गत निधी मध्ये गैरव्यवहार झाल्या प्रकरणी अयप्पा मजुर सोसायटी व तत्कालीन सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्यावर चौकशी करून गुन्हे दाखल करणे बाबत. विनंती तथा तक्रार अर्ज दाखल केला आहे सदर तक्रारीत
ठक्करबाबा योजने अंतर्गत (भांडारगृहसाठी) अंदाजे १२ लक्ष रुपये मंजुरी देण्यात आली होती व त्या मंजुरी रुपौ आपल्या कार्यालया कडुन ४ लक्ष ८० हजार रुपये अग्रीम स्वरुपात रक्कम देण्यात आली परंतु संबंधीत ठेकेदार तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांनी संगणमत करुन हि रक्कम उचल करुन स्वतः आर्थिक व्यवहार भागवला आहे. कामाला अद्यापर्यंत सुरवात झालेली नाही, तसेच ग्राम पंचायतची कुठलीही मालकीची जागा नसतांना स्वतः सरपंचाच्या स्वतःच्या नावे असलेल्या मुकबधिर संस्थेच्या जागेवर खड्ड्याचे खोदकाम करण्यात आले आहे. जेणे करून भविष्यात त्या इमारतीचा संस्थाचालकांना फायदा व्हावा हा एकमेव त्यांचा उद्देश आहे. तसेच ज्या जागेवर फक्त भांडारगृहाच्या खड्ड्याचे खोदकाम करण्यात आले ती जागा एका आदिवासी व्यक्तीची असुन भोगवटा क्रमांक २ ची आहे. ती गावापासुन अंदाजे १ ते १.५ कि.मी अंतरावर आहे. भविष्यात त्या भांडारगृहाचा शेतक-यांना कुठलाही फायदा होणार नाही.
तसेच ४ लाख ८० हजार रुपये अग्रिम स्वरुपाची रक्कम उचल करुन सरपंच ग्रामसेवक संबंधित ठेकेदार यांनी हडप केली आहे. ती त्यांच्याकडुन व्याजासहित वसुल करुन अयप्पा मजुर सोसायटीला काळ्या यादीत व परवाना रद्द करावे. तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करावा हि नम्र विनंती ! अशी विनंती
राजु लक्ष्मणराव सुरोशे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, घोटी. यांनी केली आहे..
कोणतीही तक्रार तथ्य असल्या शिवाय दाखल होत नाही .. निदान आज तरी अपहार झाला आहे असे गृहीत धरावे लागेल.. कारण अपहार झाला नसल्यास लोकसेवक यांची दिशाभूल हा गुन्हा दाखल होऊ शकतो..
ही तक्रार गुन्हेगार वेक्तीवर गुन्हा दाखल होण्यासाठीच आहे.. अन्यथा या बाबीमुळे लोकसेवक यांच्याकडे सत्य माहिती उघड करणे गुन्हा नाही परंतु लोकसेवक यांची दिशाभूल करणे हा मात्र निश्चतच गुन्हा आहे.. सत्य उघड करण्यास ही तक्रार मदत केली तर एक जागरूक राष्ट्रवादी म्हणून तरुण तडफदार उमदे नेतृत्व संपूर्ण राजकीय क्षेत्राला लाभले आहे असे जन सामान्य नागरिकातून बोलल्या जात आहे..