सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नामदार अशोकरावजी चव्हाण साहेबांची देगलूर येथे आढावा बैठक संपन्न
देगलूर तालुका प्रतिनिधी ( बसवंत जाधव आलुरकर )
देगलूर येथे संपन्न झालेल्या आढावा बैठकीमध्ये अनेक विषयावर आढावा बैठक संपन्न झाली विशेषतः पूर परिस्थिती व झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये शासनाने द्यावे ही शेतकऱ्याची विशेष मागणी होती व झालेल्या पावसामुळे पूर परिस्थितीमुळे रोडचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. झालेल्या रोडच्या नुकसानी विषयी देगलूर पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती श्री विष्णुकांत पाटील खांडेकर यांनी या आढावा बैठकीत शेकापुर लक्खा मंडगी व मैदनकलूर या गावात मंजूर झालेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्यांचे काम मंजूर असूनही कामाचे वर्कऑर्डर निघूनही गुत्तेदार काम करीत नाहीत त्या गावांना आशापुर परिस्थितीमध्ये येण्याजाण्यासाठी खूप मोठी अडचण होत आहे. तसेच खानापूर ते थडी हिपरगा होत असलेल्या राज्य महामार्गाच्या रोडच्या आजूबाजूला असलेली जमीन या पावसामुळे 100% पावसाचे पाणी जमा होऊन संपूर्ण पीक करपून गेले आहे विशेषतः शेवाळा नंदूर आलूर व शेळगाव तमलूर या शेतीला खूप मोठे नुकसान पोहोचत आहे आणि राज्य महामार्गाच्या गलथान कारभारामुळे या शेतीचे खूप मोठे नुकसान होत आहे या रोड वरती जो जो थडी हिपरगा ते जुने शेवाळा मध्ये जो पूल आहे तो छोटा झाला आहे व जुने शेवाळा ते नवीन शेवाळा पूल छोटा झालाआहे. तेथे मोठे पूल बांधून देण्यात यावे . पावसामध्ये 100%रोड उखडून गेले आहेत. या सर्व बाबीस राज्य महामार्गाच्या गलथान कारभारामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे त्यामुळे पाऊस पडून जमा झालेला पाणी त्या फुलांमधून जात नाही तो पूल छोटा झाल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. तरीही नामदार साहेबांना आमची अशी विनंती राहील की त्याठिकाणी मोठा व्हावा अशी गावकर्यांची सर्व नंदुर आलूर शेवाळा शेळगाव तमलुर येथील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन ही जे राज्य महामार्ग बनवित आहेत जे कोणती कंपनी असेल त्या कंपनीच्या विरोधात उपोषणाला बसण्याची तयारी दर्शवली आहेत. अशी पोटतिडीक उपसभापती श्री विष्णुकांत पाटील खांडेकर यांनी माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचा समोर मांडले. तसेच मंडगी ग्रामपंचायत सदस्य श्री सूर्यकांत गायकवाड यांनी ही व्यथा मांडल्या. तरी श्री अशोकराव चव्हाण साहेबांनी सकारात्मक उत्तर दिले व शंकांचे निरसन होईल याची ग्वाही दिली. यावेळी ओला दुष्काळ ही जाहीर करण्यात यावे ही मागणी करण्यात आली.यावेळी उपस्थिती माननीय जिल्हाधिकारी बिपिन इटनकर, विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार वसंतराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रामराव नाईक, माझी पंचायत समिती सभापती शिवाजी देशमुख बळेगावकर, माजी जिल्हा परिषद सभापती माधवरावजी मिसाळे गुरुजी, प्रदेश सरचिटणीस जितेश भाऊ अंतापूरकर, देगलूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार, माजी नगराध्यक्ष शंकरराव कंतेवार, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, तहसीलदार देगलूर विनोद गुंडमवार, पंचायत समिती सभापती संजय वल्कले, उपसभापती श्री विष्णुकांत पाटील खांडेकर, तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आढावा बैठकीस उपस्थित होते.