IBPS मार्फत घेण्यात आलेली Tait परीक्षा रद्द करा*रिपब्लिकन सेना
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.13.रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.जिल्हा निहाय महानगरपालिका,नगरपालिका,जिल्हा परिषद,अनुदानित विनाअनुदानित शैक्षणिक संस्था यातील रिक्त प्राथमिक शिक्षक व रिक्त माध्यमिक शिक्षक(विषयानुसार) यांचे मूल्यांकन न करता;एकूण भरावयाच्या पदांचे रोस्टर तयार न करता;भरवण्याच्या पदांचे नोटिफिकेशन न काढता;TET पेपर १ व TET पेपर २ उत्तीर्ण न होता परीक्षा लिहिण्याची परवानगी परीक्षार्थींना देण्यात आली.मागच्या महिन्यात अत्यंत बेकायदेशीरपणे शासनाने IBPS मार्फत Tait परीक्षा घेतली.
शिक्षक असा समाजातील घटक आहे.जो ज्ञान मूल्य सद्गुण प्रदान करते आणि शाळेत विद्यार्थ्यांना प्रेरणा देते एक शिक्षक आपल्या जीवनात गुरु पालक शिक्षण प्रशिक्षक आणि मार्गदर्शक अशा उल्लेखनीय भूमिका बजावतो, आणि आपल्या जीवनातील यशाचा मार्ग दाखवतो.
अशा शिक्षकांची परीक्षा IBPS मार्फत घेण्यात आली जी बँक क्लार्क पदासाठी घेण्यात येते.
एकंदरीत मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता IBPS परीक्षेचे स्वरूप बँक क्लर्क पदासाठी अनुरूप असते तर शिक्षक पदासाठी शिक्षकीय दृष्टिकोनातून सर्व समावेश शिक्षा यांचा समावेश असतो एखाद्या क्लर्क ला शिकवणी वर्ग घेण्यासाठी वर्गावर पाठवले असता विद्यार्थ्यांशी अनुरूप होता येत नाही.IBPS मार्फत घेण्यात आलेली Tait परीक्षा शिक्षकी पदासाठी अनुरूप नव्हती ती परीक्षा बँक क्लार्क पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा सारखी परीक्षा होती.
शिक्षक पदासाठीची परीक्षेचे निकष वेगळे असतात परंतु घेण्यात आलेली Tait परीक्षा बँक क्लार्क पदासाठीची अनुरूप होती.
सदरील बाबींचा शासनाने गांभीर्याने विचार करून IBPS मार्फत घेण्यात आलेली Tait परीक्षा रद्द करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.