समर्पण व त्यागाची जिवंत मूर्ती म्हणजे सैनिकांची आई आणि पत्नी होय…न्यायाधीश श्रीमती सपना हरणे
*सैनिक कल्याण समिती,धर्माबाद आयोजित सैनिक माता/पत्नी सन्मान सोहळ्यास शेंकडों महिलांची उपस्थिती*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.13.जिल्यातील सैनिक कल्याण समिती धर्माबादच्या वतीने आयोजित भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या माता व पत्नीचा सन्मान व समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कृर्तत्वाने ठसा उमटवणाऱ्या कृर्ततत्वान स्त्रियांचा सन्मान जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आर्यभवन येथे दिनांक अकरा मार्च रोजी दुपारी दोन वाजता भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्माबाद न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती सपना हरणे हे होत्या तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून नांदेड येथील कवियत्री अनिता दाणे जुंबाड व धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे,मा. गटविकास अधिकारी राजेंद्र प्रसादबजाज हे होते.
धर्माबाद सैनिक कल्याण समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सैनिक कल्याण समितीचे सचिव श्री शिवकुमार पाटील यांनी केले.प्रास्ताविकेतुन त्यांनी सैनिकांच्या सन्मानाचा नऊवर्षाच्या प्रवासाचा उलगडा करत कार्यरत 36 जवानांच्या परिवाराची माहिती दिली.सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवराज पाटील गाडीवान यांनी आपल्या मनोगतातून मागील नऊ वर्षापासून समितीच्या वतीने भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांसोबत दरवर्षी दिपावळी साजरी करत इतर उपक्रम राबवित आहोत. आमचे सैनिक कल्याण समिती हा एक परिवार झाला असून हा पारिवारिक ऋणानुबंधाचा संबंध दृढ झाला आहे व सैनिकांच्या सुखदुःखात आम्ही सदैव सामीला होत असतो असे आपले मत व्यक्त केले.
यावेळी लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.प्रतिभा येरेकर मानकर,लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या ज्युनियरच्या प्राचार्या प्रा.वसुंधरा वडवळकर, धर्माबाद येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.मीना वेंकटेश जोशी,राजस्थानी महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष सौ शकुंतला रमेशजी झंवर,धर्माबाद येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. नसीमा इकबाल शेख,प्रा.शाळा बामणीच्या सहशिक्षिका सौ उज्वला गंगाधरराव इंगळे, व प प्रा.शा चोळाखा च्या सौ वैशाली अशोक स्वामी यांना कर्तुत्ववान स्त्री सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना कवियत्री अनिता दाणे यांनी स्त्रियांच्या संवेदनशील मनाचा आपल्या कवितेतून स्त्रियांचा संवेदनशील मन व त्यांच्या भावना व्यक्त केल्या तर सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पत्नी आणि आई यांच्या व कुटुंबाप्रती आपण सदैव कृतज्ञ असले पाहिजे असे उद्गार धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा धर्माबाद न्यायालयाच्या मा.न्यायाधीश सपना हरणे यांनी महिलांचे कौटुंबिक कलहातून होणारे वाद त्याविषयी कायदेशीर ज्ञान महिलांचे हक्क कर्तव्य या विषयावर सखोल मार्गदर्शन करीत असताना सैनिक परिवारातच मी सून म्हणून दाखल झाले.
समाजाने सैनिकांच्या परिवारांचा मानसन्मान राखलाच पाहिजे व सिमेवर कार्यरत आपल्यासाठी लढणाऱ्या सैनिकांमुळेच आपण आपल्या देशात सुखरूप शांतिने जगत आहोत देशाचा कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सैनिकांच्या हाती असल्याने सर्व भारतीयांनी शेतीत राबणारा शेतकरी व सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा सन्मान सदैव राखला पाहिजे असे मत न्यायमूर्ती सपना हरणे यांनी व्यक्त केले.भारतीय सीमेवर लढणाऱ्या अनेक सैनिकांच्या वीर माता व पत्नी ह्या जेव्हा पुरस्कारासाठी व्यासपीठावर येत होत्या तेव्हा संपूर्ण सभागृह उभा राहून त्यांना मानवंदना देत होते.
अवघ्या वर्षाची दोन वर्षाची लेकरे कोणाच्या कडेवर होती तर अत्यंत क्षीण झालेली वृद्ध माता कुठे जवानांचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर येत असताना सगळ्यांच्या डोळ्यात अश्रूतरळत होते अत्यंत हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन सैनिक कल्याण समितीने केल्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
हा सुखद अनुभव सोहळा फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संपूर्ण भारतीय सीमेवर लढणाऱ्या जवानांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न समितीने केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवराज पाटील गाडीवान,सचिव शिवकुमार पाटील,दत्तात्रय कावडे,गणेश गिरी, जि पि मिसाळे सर,अशोक पडोळे सर कैलास चंदोड, बाबुराव गोणारकर,ललेश संगावार,संतोष दरयापुरे, गजानन चंदापुरे नागनाथ माळगे, कमलाकर ,व सैनिक कल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी सदस्यांनी परिश्रम घेतले , शहरातील विविध राजकीय सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या हे विशेष. सैनिक परिवाराच्या उपस्थितीने संपूर्ण सभागृह भरले होते व जवळपास चार तास झालेल्या कार्यक्रमात पूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले असून शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.