महिला दिनाचे औचित्य साधून महिला तपासणी शिबिराचे आयोजन
नांदेड जि.प्रतिनिधी(संजीवकुमार गायकवाड)
महिला दिनाचे औचित्य साधून महिला तपासणी शिबिराचे आयोजन दशमेश हॉस्पिटल यात्री निवास रोड नांदेड येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ जयश्रीताई पावडे माजी महापौर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या होत्या.
तर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री डीपी सावंत व आमदार नांदेड दक्षिणचे मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस जिल्हा कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग काँग्रेस नांदेडचे शमीम अब्दुल, अधीक्षक गुरुद्वारा साहेब नांदेडचे सरदार ठाणसिंग बुंगइ, शहर जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया काँग्रेस इंजिनीयर हरजिंदर संधू, प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी विचार मंच महाराष्ट्र तसेच जिल्हाध्यक्ष संपादक व पत्रकार सेवा संघाचे संजीव कुमार गायकवाड, मेडिकल ऑफिसर दशमेश हॉस्पिटल नांदेड डॉक्टर परमवीर सिंग गुरमीतसिंग नबाब, माजी नगरसेवक सौ कांताबाई मुथा, माजी नगरसेविका प्रभाबाई यादव, माजी नगरसेविका सौ अनुजा अमिता सिंह तेहरा, शहराध्यक्षा महिला काँग्रेस कमिटी नांदेड, डॉक्टर शुभांगी अंकुश देवसरकर, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सेल काँग्रेस कमिटी नांदेड.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन संजीव कुमार गायकवाड जिल्हाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नांदेड व सर्व सदस्य, राजकमलसिंघ लालसिंघ गाडीवाले अध्यक्ष निष्काम सेवा प्रतिष्ठान नांदेड व सर्व सदस्य, राजकमल सिंध लालसिंध गाडीवाले शहर जिल्हाध्यक्ष राहुल गांधी विचार मंच नांदेड व सर्व सदस्य यांनी केले होते.