जुनी पेन्शन मागणी करिता होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत संपात किनवट प्रकल्पातील सर्व कर्मचारी सहभागी होत असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन
KTN महाराष्ट्र NEWS | दि.14 मार्च 2023 रोजी जुनी पेन्शन मागणी करिता होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत संपात किनवट प्रकल्पातील सर्व कर्मचारी सहभागी होत असल्याचे निवेदन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट जिल्हा नांदेड यांना आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक प्रकल्प समितीच्या वतीने देण्यात आले आहे.
नोव्हेंबर 2005 नंतर राज्यातील कार्यरत राज्य शासकीय कर्मचारी वृंदांना नवीन पेन्शन योजना( एन पी एस) लागू करण्यात आली आहे तेव्हापासून मागील 17 वर्ष लोकशाही मार्गाने विविध आंदोलने केली असता अद्याप कोणत्याही शासनाने न्याय दिला नाही. यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दिनांक 14 मार्च 2023 रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात उपरोक्त संदर्भानुसार राज्य समिती सहभागी होत आहे.
त्यानुसार किनवट प्रकल्पातील सर्व कर्मचारी या संपात प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. नवीन पेन्शन योजना ही अन्यायकारक असून जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी याकरिता आम्ही सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी होत आहोत. करिता आपणास सविनय विनंती करण्यात येत आहे की, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनीकरण्यात यावी ही आमची मागणी आपल्या मार्फत शासनास कळविण्यात यावी. संपातील सहभागी कर्मचाऱ्यांचा सहानुभूतपूर्वक सहकार्य करावे अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डी एस घुले प्रकल्पाध्यक्ष, गजानन मेंडके प्रकल्प सचिव.यांचे सह प्रकल्प समिती किनवट आदिवासी विकास कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक चे सर्वच कर्मचारी सहभागी झाले आहेत.