शैक्षणिक साहित्य वाटून स्व .अर्जुनरावजी गोतावळे यांना आदरांजली
जिवती :- जिवती तालुक्यातील कुंभेजरी येथील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते स्व .अर्जुनराव गोतावळे यांचे निधन 5 ऑगस्ट 2016 ला सहा वर्षांपूर्वी झाले होते .त्यांची शिक्षणाबद्दलची आस्था आणि शिक्षणानेच माणसाचे जीवन बदलते यावर त्यांचा प्रगाढ विश्वास होता .त्यामुळे त्यांनी हालअपेष्ठा सहन करून आपल्या चारही मुलांना उच्यशिक्षित केले असून त्यांची मुले श्री सुग्रीव गोतावळे हे प्राध्यापक ,श्री अंकुश गोतावळे हे डॉक्टर ,श्री दीपक गोतावळे हे शिक्षक तर श्री लहू गोतावळे हे औषधनिर्माता आहेत .
आपल्या वडिलांची शिक्षणावरची आस्था आणि सामाजिक कार्य स्वतः पाहिलेल्या त्यांच्या मुलांनी स्व .अर्जुनराव गोतावळे यांच्या निधनानंतर दरवर्षी कुठलेही धार्मिक विधी न करता त्याऐवजी शाळेमधील विध्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप करून आपल्या वडिलांना आदरांजली वाहतात .यावर्षी सुद्धा 5 ऑगस्ट ला आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनी कै .अण्णाभाऊ साठे विद्यालय ,कुंभेजरी येथे विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून वडिलांना श्रद्धांजली दिली .यावेळी झालेल्या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री एन एल पाचभाई सर ,श्री प्रा जे एच गांजरे सर ,श्री व्ही एन लोंढे सर ,श्री पेंदोर सर ,श्री .वाघमारे सर ,श्री मालेकर सर ,श्री जिवाने सर ,सौ बुचे मॅडम ,सौ नांदुरकर मॅडम ,श्री बोरीकर सर ,श्री डवरे ,श्री बोन्डे ,श्री डवरे तसेच गोतावळे कुटुंबाचे सदस्य श्री .डॉ अंकुश गोतावळे ,श्री अंबादास गोतावळे ,श्री लहुजी गोतावळे ,श्री रणजित सूर्यवंशी ,श्री ज्ञानोबा अकृपे ,श्री रामू गोतावळे तसेच इतर अनेकजण उपस्थित होते .यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले .