किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

*शासनाच्या डोळ्यात धूळफेक करित करोडो रुपयांचा सट्टाबाजार धर्माबाद येथे तेजीत चालू* *औरा 24 पार्कबेट साई बेटिंग अँप चालविण्यासाठी आंतरराज्य टोळी सक्रिय*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२९.जिल्यातीलधर्माबाद तालुका हा आधी मोठी बाजार पेठ मिरचीबाजार पेठ म्हणून ओळख असलेला तालुका त्यात बाभळी बांधाऱ्या मुळे तर देशात या तालुक्याचे नाव गाजलेते आंध्रप्रदेशातील मुख्यमंत्री आमदार यांना महाराष्ट्र आंध्र सीमेवरील बिद्राळी येथे तुडून शहरातील आय.टी.आय.येथे डाबूनठेवले होते त्या मुळे धर्माबाद तालुक्याचे नाव देशातील प्रिंट मीडिया, इलेक्टनिक मीडिया आंध्र प्रदेश,महाराष्ट्र प्रदेशात चांगले नावा रुपाला आले होते पण काही सट्टेबाज मटका, गुटखा,ऑनलाईन लॉटरी,तीन पत्ते रमी,सिंदी,अवेध दारूविकणाऱ्या लोकांनी तरुण मुलांना क्षणात श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून ऑनलाईन सट्टेबाजी अँपचे लिंक देवून करोडो रुपयांचा चुना लावीत एजेंट लोकांनी करोडो रुपयांची माया जमवित आहेत.धर्माबाद सह अन्य ठिकाणी आलिशान घर बांधीन शेत जमिनी विकत घेत हजारो मुलांना बेटबिगारीला लावल्यामुळे एजेंट सह अँपच्या मालकांना बेड्याठोकून तुरुंगात पाठविणे अत्यंत आवश्यक आहे असे सुज्ञ पालक वर्गातून चर्चिले जात आहे.

टपोरी एजेंटकडे ब्रँडेड मोबाईल, घड्याळ,मोटारसायकल,कार या वस्तू सट्टेबाजीच्या उत्पन्नातून येत आहे या एजेंट वर्गाचे अकाउंट डिटेल्स तपासल्यास कुठे घाम गाळून परिश्रम घेतले आहे हे सिद्ध होईल.

भारतात सट्टा लावणे बेकायदेशीर आहे.मात्र, तरीदेखील भारतात छुप्या पद्धतीने सट्टेबाजारात सट्टेखोर सट्टा लावतात.अनेकदा याविरोधात पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई देखील केली जाते.

विद्यमान औरा 24 आणि साई पार्कबेट बेटिंग अँप हे अवैध पद्धतीने चालू आहे. हे अँप टॅक्स पियर नाहीत.तरीही यावर अद्याप पर्यंत ही कोणतीच ठोस कार्यवाही झाली नाही या मागचे गौडबंगाल काय आहे स्पष्टपणे दिसून येते नाही.

औरा 24 अँप साई अँपचे मालकांच्या धर्माबाद ते गुजरात,तेलंगणा,आंध्रप्रदेश, गोवा,राज्यस्थान येथील ऑनलाईन बेटिंग सट्टेबाजांसोबत संबंध असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

सट्टेबाज मालकांवर तात्काळ ई.डी.सी.आय.डी.मार्फत कार्यवाही व्हावी यासाठी अनेकांनी तक्रारी केल्या असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले आहे.

तरुणाईला जास्तीच्या टक्केवारीचे आमिष दाखवून कर्ज बाजारीच्या खाई लोटणाऱ्या सट्टेबाजांवर कार्यवाईचा फास कधी आवळणार आहात असा प्रश्न सुजाण नागरिक विचारत आहे.

70 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.