किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

जुन्या नगर परिषदे समोरील संविधान स्तंभा भोवतालचे अतिक्रमण त्वरीत काढुन सुशोभीकरण करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा- सिद्धार्थ नगर नवयुवक मंडळ व युवा पँथरचे तहसिलदार यांना निवेदन

किनवट बातमीदार:-
किनवट शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुन्या नगर परिषदे समोरील लोकशाहीचे प्रतिक असलेले संविधान स्तंभ( स्मारक) हे फार जीर्न झाले असुन त्याच्या भोवताल परीसरात आईस्क्रीमचे , पाणीपुरी विक्रेते व इतर हातगाड्यांनी अतिक्रमण केले असुन ते वापरलेले प्लास्टीक ग्लास , पिशव्या तसेच धुतलेले सांडपाणी संविधान स्मारकाची विटंबना करीत आहेत .

संविधान स्मारक हे जुन्या काळातील मुख्य चौक असुन स्वातंत्र्य समता बंधुता व एकतेची प्रेरणा देणारे स्थळ आहे या कडे नगर परिषद प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असुन संविधान प्रेमी नागरीकांकडुन येत्या २६ नोव्हेंबरला संविधान स्मारक येथे संविधान गौरव दिन , रक्तदान शिबिर इत्यादी कार्यक्रम होणार आहे तरी त्वरीत बाजुचे अतिक्रमण काढून संविधान स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात यावे या आशयाचे निवेदन मा. तहसिलदार यांना देण्यात आले तसेच त्याच्या प्रतिलिपी , मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय किनवट , उपविभागीय कार्यालय किनवट, पोलिस निरीक्षक साहेब , पोलीस ठाणे यांना सादर करण्यात आले आहेत सदरील निवेदनावर सतिष उत्तमराव कापसे, प्रदुमन राठोड, ओमकार शर्मा, आकाश आळणे, स्वप्नील सर्पे, संघर्ष घुले, राजेंद्र भातनासे, ब्रम्हानंद एडके, निखील ओंकार, शुभम पाटील, विनोद सी भरणे, निखील कावळे, सुमेध कापसे, विनोद रावळे, अतीफ शेख, अनिल कांबळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत तर राजेश पाटील ,प्रशांत ना. ठमके , प्रतीक नगराळे, सुगत भरणे,
आदर्श शिलवंत येरेकर , कामेश मुनेश्वर , वसंत नगराळे , सम्राट सर्पे सर्प , गौतम पाटील यासह युवा पँथर आंबेडकरी संघटनेचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

101 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.