किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

लोकनेते संदीप यांच्या निखाते नेतृत्वाखाली किनवट येथे सरपंचाची महत्वपूर्ण बैठक संपन्न

किनवट /प्रतिनिधी: किनवट सारख्या आदिवासी मागास भागातील सरपंच उपसारपंचावर होणारे अन्याय अत्याचार तसेच त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोक नेते संदीप निखाते नेतृत्वाखाली आज किनवट येथे सरपंचाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून बैठकीत सक्रीय सरपंच संघटना स्थापन करण्यावर चर्चा होऊन तसेच संदीप निखाते यांच्या नेतृत्वाखाली सरपंचांचे प्रश्न मार्गी लावण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला
5 डिसेंबर 20 21 रोजी छत्रपती शिवाजी महाराज राजे मंगल कार्यालय घोटी येथे सरपंच उपसरपंच यांची बैठक लोकनेते संदीप निखाते यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या बैठकीमध्ये निखाते यांनी सरपंच व उपसारपंचाच्या विविध समस्या व प्रश्न जाणून घेतले
भारतीय लोकशाहीत सरपंच हा गावप्रमुख तसेच प्रथम नागरिक असतो पण किनवट तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक व गावातील प्रस्थापित लोक सरपंचाच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत ग्रामपंचायतीचा कारभार करत असतात.सरपंचावर अविश्वास ठराव आणून त्यांना पायउतार करणे, विकासात्मक योजना राबविताना त्यांच्या विरोधात नाहक तक्रारी करून त्रास देणे यासह परस्पर निधी उचल करून आर्थिक गैरव्यवहार करणे असे प्रकार नेहमीच घडत असतात ग्राम पातळीवर अशा प्रकारांना आळा घालून सरपंचाना त्यांच्या संविधानिक हक्क व अधिकारानुसार ग्राम पंचायतीचा कारभार करता यावा तसेच सरपंचांचे विविध प्रश्न शासन दरबारी मार्गी लावण्याच्या अनुषंगाने हि बैठक आयोजित केली होती
बैठकीत सरपंचावर होणाऱ्या अन्याय अत्याचार,ग्रामसेवकांचा कारभार विविध शासकीय योजना तसेच सरपंचाचे हक्क व अधिकार याबाबत सांगोपांग चर्चा झाली
किनवट सारख्या मागास दुर्गम तालुक्यातील गावांना समृद्ध करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कडून विविध योजने मार्फत दरवर्षी कोट्यवधी रु निधी मंजूर होत असला तरी या निधीचा विनियोग कसा करावा याबद्दल सरपंच लोकांना परिपूर्ण कायदेशीर ज्ञान नसल्याने तो प्रमुख असूनही सर्वस्वी ग्रामसेवकावर अवलंबून असल्याने विकासा ऐवजी आणि आर्थिक घोटाळ्याचेच प्रकरणे जास्त घडत असतात आणि अशा वेळी प्रशासकीय यंत्रणा सरपंचाना दोषी ठरवून नामानिराळे राहतात हे अत्यंत गंभीर असल्यामुळे सरपंचाना एकजूट होणे गरजेचे आहे सारपंचांची एक सक्रिय व्यापक सरपंच संघटन असेल तरच त्यांना त्यांच्या हक्क अधिकाराचा वापर करून कोणावरही विसंबून न राहता गावाचा विकास साधता येणार आहे अशा वेळी गाव विकासा संदर्भात जर सरपंचावर अन्याय होत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन संदीप निखाते यांनी यावेळी बोलताना दिले आहे
ठरून सरपंच गोपीनाथ बुलबुले शरदा अनिल सिंगारे सरपंच इस्लापुर, सुनील मोहन आडे सरपंच नांदगाव हे उपस्थित होते
सरपंच गोपीनाथ बुलबुले यांनी संघटनेला महत्व पटवून देत असताना पुढे म्हणाले की संदीप भाऊ ने चांगल्या ह्या बैठकीचे नियोजन केले आहे व सर्व सरपंचना एकत्र करून सरपंच उपसरपंच संघटना ताकतीने मजबूत करू असे बुलबुले यांनी बोलून दाखवले आहे
तर नंदगाचे सरपंच यांनी सरपंचांवर आज काल खुप अन्याय होत आहे सादा ग्राम सेवक सरपंच ना माघे फिरवतो हे कुठे तरी बदल झाला पाहिजे सरपंचांना सरपंच चे अधिकार कळाले पाहिजे यावेळी सरपंच बालाजी पावडे रामरेड्डी आईटवर, जयंत कांबळे, राकेश तोटावर,भीमराव कनांके, देवराव लोभाजी नैताम,भावराव देवीसिंग आडे, शिवकण्या विसनु पेंदोर, अभिमान घोडाम, पुंडलिक पुसनाके, अर्जुन कुमरे, वनमाला तोडसाम, मारोती आत्राम अनिता मडावी, निलबाई पवार प्रहलाद सेंडे, विठ्ठल श्रीमनवार, एस अहमद अली, गंगाराम सलाम आत्माराम मुंडे यांची उपस्थिती होती

167 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.