किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सगरोळी जवळ मांजरा नदी पात्रात सापडले अनोळखी पुरुषाचे प्रेत; बिलोली पोलिसांचे जनतेला ओळख पटवण्यासाठी आवाहन ;अनेक व्रत पत्रातून या घाटा विषयी बातम्या प्रकाशीत झाल्या होत्या

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.8.जिल्यातील बिलोली तालुक्या मधील मांजरा नदीच्या पात्रात एका ३५ वर्षीय अनोळखी माणसाचे प्रेत सापडले आहे.सदर रेती घाट चालू झाल्या पासून येथील ठेकेदार यांच्या कडून पत्रकारांना धमाकावणे घाटावर येण्यास मज्जाव करणे पोसलेल्या गुंडा कडून धक्का बुकी करणे जीवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार रोज चालत असल्याची लेखी व तोंडी तक्रार प्रशासनास सांगूनही कोणत्याच प्रकारची दखल प्रशासना कडून घेतली गेली नाही.

हे विशेष त्यामुळे हि हत्या आहे कि त्याचा खून करण्यात आला हे पोलीस तपासात निष्पण होईल.

बिलोली पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की या अनोळखी माणसाची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे.

आज दिनांक ८ एप्रिल रोजी सगरोळी जवळच्या मांजरा नदी पात्रात एका ३५ वर्षीय अनोळखी माणसाचे प्रेत सापडले आहे.

सगरोळीचे उप सरपंच विश्वनाथ माधवराव महाजन यांनी दिलेल्या खबरीनुसार बिलोली पोलिसांनी या अनोळखी माणसाच्या मृत्यू बाबत अकस्मात मृत्यू क्रमांक १४/२०२२ फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७४ प्रमाणे दाखल केला आहे.

बिलोलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी सांगितल्या प्रमाणे मयत अनोळखी माणूस ३५ वर्षांचा आहे.अंगात मळकट पांढरा शर्ट आणि काळा पँट परिधान केलेला आहे.त्या अनोळखी मयताच्या कमरेला करदोडा बांधलेला आहे.डोईफोडे यांनी जनतेला आवाहन केले आहे की,या अनोळखी मयताची ओळख पटवण्यासाठी जनतेने त्यांना काही माहिती असल्यास त्यांनी बिलोली पोलिसांना याबाबत माहिती द्यावी.पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांचा मोबाईल क्रमांक ९८२३८८९०३७ असा आहे

112 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.