नांदेडमध्ये पुन्हा फायरिंग; पण ही फायरिंग पोलीसांनी केली
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.8. पर्वा नांदेड शहरातील एका बांधकाम व्येवसायिक असलेल्या बियाणी यांचा त्याच्या घरासमोरचं दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली होती तेव्हा पासून नांदेड पोलीस अधिक सतर्क झाले असून गुन्हे गारी प्रवर्तीच्या गुंडाचा शोध घेत असताना स्वरक्षनातं वरील घटना घडली आहे.
म्हणून फायरिंगच्या कारणावरुन आज नांदेड पुन्हा एकदा चर्चेत आले.पण आजची फायरींग अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड साहेबांनी केलेली आहे.
कौठा येथील एका युवकाच्या घरात थेट गेल्यानंतर झालेल्या बाचा बाचीनंतर साहेबांनी फायरिंग केल्याची चर्चा कौठा परिसरात होत आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास कौठा परिसरातील संजूसिंग राजूसिंग बावरी यांच्या घरात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस पथक आपले प्रमुख श्री.अशोकरावजी घोरबांड यांच्यासोबत गेले.कौठा परिसरातील लोक सांगतात आत काय झाले हे माहित नाही.पण फायरिंगचा आवाज आला.
यानंतर पोलीस सांगत आहेत की, संजूसिंग राजूसिंग बावरीने पोलीसांवर हल्ला केला आणि त्यावर फायरिंग करण्यात आली. अशोकरावजी घोरबांड यांनी केलेल्या फायरिंगमध्ये संजूसिंग बावरी हा जखमी झाला आहे.
व्हॉटसऍप या संकेतस्थळावर व्हायरल होत असणाऱ्या शब्दांप्रमाणे संजूसिंग बावरीने तलवार घेवून पोलीसांवर हल्ला केला.संजूसिंग बावरीच्या पायावर गोळी लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे.व्हाटसऍप संकेतस्थळावर फिरणाऱ्या संदेशानुसार पोलीस आपल्या दिशेने येत आहेत या भितीने संजूसिंगने पोलीस गाडीची काच फोडली आणि तलवार फिरवली म्हणे त्यात नांदेड ग्रामीण पेालीस ठाण्यातील अत्यंत जबरदस्त पोलीस अंमलदार शिवाजीरावजी पाटील हे जखमी झाले आहेत.
आपल्यावर हल्ला चढण्याआधीच श्री.अशोकरावजी घोरबांड साहेबांनी आपल्या पिस्तुलातून फायरींग केली आहे.