सा.बां.विभागाचे मुख्य अभियंता खंडेराव पाटील आणि अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे विरुध्द आ.प्रशांत बंब 11 एप्रिल रोजी सादर करणार पुरावा
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.8.नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या डांबर घोटाळ्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 17 नुसार नांदेडच्या पोलीस निरिक्षक मिना बकाल यांनी दिलेल्या पत्रानंतर डांबर आणि रस्ते घोटाळ्यात अत्यंत अभ्यास असलेले आ.प्रशांत बंब 11 मार्च रोजी पुराव्यांसह नांदेडला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात येणार आहेत.
सन 2019 मध्ये नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 115/2019 दाखल झाला. त्याच गुन्ह्याच्या अगोदरच आ.प्रशांत बंब यांनी रिट याचिका क्रमांक 859/2018 मुंबईउच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल केली.या डांबर घोटाळ्यातील गुन्ह्यामध्ये कांही कंत्राटदारांना अटक झाली होती.
जवळपास 100 दिवस तुरूंगवास भोगल्यानंतर कंत्राटदारांची जामीन झाली होती.आ.प्रशांत बंब यांनी फक्त कंत्राटदारांना आरोपी करून चालणार नाही.कारण या डांबर घोटाळयात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या कशा चुका आहेत.हे प्रशांत बंब यांनी उच्च न्यायालयात तर सांगितलेच पण पत्रकारांनाही अनेकवेळेस झालेल्या घोटाळ्यातील तांत्रिक बाबी सांगितल्या.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती टी.व्ही. नलावडे आणि न्यायमुर्ती मंगेश पाटील यांनी रिट याचिका क्रमांक 859/2018 मध्ये आपले निरिक्षण नोंदवतांना भरपूर बाबी लिहिल्या ज्यामध्ये अभियंत्यांच्या निरिक्षणाशिवाय डांबर वापरले गेले. त्यांनी त्यास प्रमाणित केले नव्हते. आणि या घोटाळ्यात भरपूर मोठी रक्कम दिसते.
त्यामुळे शासनाने उत्तम प्रकारे याचा तपास करावा तपासीक अंमलदारांना योग्य ते कागदपत्र मिळावेत आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 17 नुसार सुरू केलेल्या चौकशीला तक्रारदार आणि शासकीय अधिकाऱ्यांनी सहाय करावे असे लिहिले आहे.
सोबतच सार्वजिनक बांधकाम विभागाचे अनेक अधिकारी आपल्या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत असेही वाक्य या निर्णयात आहे.
नांदेड जिल्ह्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरिक्षक मीना बकाल यांनी आ.प्रशांत बंब यांना 11 एप्रिल 2022 रोजी पाठविलेल्या पत्रानुसार सार्वनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता खंडेराव तुकाराम पाटील आणि अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे व इतरांविरुध्द सुरू असलेल्या चौकशीत दस्तऐवज (पुरावा) सह 11 एप्रील रोजी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
नांदेड जिल्ह्यात झालेला हा डांबर घोटाळा राज्यात गाजविणाऱ्या आ.प्रशांत बंब यांच्या मोठ्या अभ्यासपुर्ण मेहनतीचा परिणाम आहे.
तसेच सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामाबद्दल सुध्दा आ.प्रशांत बंब यांना माहिती आहे त्यात काय चुकते आहे हे त्यांनी विधानसभेत मांडतांना यासाठी खर्च होणारा पैसा हा सर्व सामान्य नागरीकांचा पैसा आहे आणि त्याचा जबाब विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे असे सांगितले होते.
बऱ्याच वर्षापासून नांदेडमध्येच ठाण मांडून आपले उखळ पांढरे करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आपली खरी जागा काय आहे हे दाखविण्यासाठी प्रशांत बंब यांनी घेतलेली मेहनत आता तरी फळाला येईल अशी अपेक्षा आहे.