लालपरी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण , केक कापून केला 74 वा वाढदिवस साजरा. नागरिकांनी एसटीनेच प्रवास करावा, आगार प्रमुख डफळे यांचे आवाहन.
किनवट l प्रतिनिधी.
राज्याची लालपरी एसटी, सुवर्ण महोत्सवी 75 व्या वर्षात पदार्पण करीत याप्रसंगी किनवट आगाराचे नव्याने रुजू झालेले व्यवस्थापक, श्री डफळे, बस स्थानक प्रमुख साईनाथ मुंडे, पत्रकार दिलीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती सर्व सामान्य माणसाचा प्रवास सुखकर आणि आरामदायी करणारी एसटी आज 74 वर्षे पूर्ण करून 75 व्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केली सीएसटी खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाची जीवनसंगिनी एसटी माफक दरात आणि वेळेवर सुखरूप सेवा देणारी वाहतूक संस्था यांचा विकास साधण्याच्या हेतूने सर्वतोपरी नागरिकांनी अधिकृत अशा सेवेचा वापर करावा असे आगार व्यवस्थापक डफळे यांनी सूतोवाच केले.महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन सतत प्रवाशांना सेवा देणारी एसटी चा आज ७४ वा वर्धापन दिन किनवट आगारात साजरा करताना मनाला वेगळा आनंद निर्माण होत आहे.
१ जून १९४८ ला एसटी ची स्थापना झाली. यानिमित्ताने सर्व आगाराला पुष्पमाला घालून सजविण्यात आले होते. बसस्थानकात उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापून पेढे वाटले.तर सर्व प्रवाशांना फुले देऊन एसटीने प्रवास करण्यचे आवाहन नवनियुक्त आगार प्रमुख एस बी डफळे यांनी केले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी देखील उपस्थित सर्व नागरिकांना ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास ‘असे म्हणत एसटीने प्रवास करा असेआवाहन नागरिकांना केले.
या कार्यक्रमाला कार्यशाळा अधिक्षक खिल्लारे, ,गण्णोजवार,डुबेवार,जाधव,ठाकुर, नारलेवार,एंड्रलवार, लिपिक डवरे, आगारातील सर्व वाहक,चालक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी सह मोठ्या प्रमाणात स्त्री-पुरुष प्रवासीउपस्थित होते.