किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

संजय बियाणी हत्याकांड प्रकरणात सहा जण दहा दिवस पोलीस कोठडीत

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.1 जून.शहरातील मोठे बिल्डर संजय बियाणीची हत्या खंडणी आणि देण्या-घेण्याच्या वादातून झाली. या प्रकरणात 55 व्या दिवशी आम्ही सहा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पुढे सुध्दा सुरू राहणार आहे.हा तपास करतांना आम्हाला परदेशामध्ये चार ठिकाणी पत्र व्यवहार करावा लागला. सहा राज्यांमध्ये तपास करावा लागला. या कामात 20 पोलीस अधिकारी,60 पोलीस अंमलदार कार्यरत होते.

सोबतच पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही नक्कीच या प्रकरणातील इतर सर्व आरोपींना गजाआड करणार आहोत, अशी माहिती नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दि.5 एप्रिल 2022 रोजी शहरातील गीतानगर भागात बांधकाम व्यवसायीक संजय बालाप्रसाद बियाणी (51) यांची सकाळी 10 वाजता दोन बंदुकधारी मारेकऱ्यांनी आपल्या बंदुकीतून दहा गोळ्या झाडून हत्या केली.

या प्रकरणी अनिता संजय बियाणी यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 119/2022 दाखल केला. त्या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 302, 307, 34 आणि 3/25 हत्यार कायदा अशी कलमे जोडण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली.या एसआयटीचे प्रमुख अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे हे आहेत. पण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी,पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या अत्यंत बारकाईच्या देखरेखीत या प्रकरणाचा तपास सुरू होता.

काल दि.31 मे रोजी अर्थात संजय बियाणी यांची हत्या झाल्यानंतर 55 व्या दिवशी पोलीसांनी इंद्रपालसिंघ उर्फ सन्नी तिरथसिंघ मेजर(35) रा.चिखलवाडी कॉर्नर नांदेड, मुक्तेश्र्वर उर्फ गोलू विजय मंगनाळे (25) रा.नाईकनगर नांदेड, सतनामसिंघ उर्फ सत्ता दलबिरसिंघ शेरगिल(28), रा.शहीदपुरा नांदेड, हरदिपसिंघ उर्फ सोनू पिनीपाणा सतनामसिंघ बाजवा(35) रा.अबचलनगर रोड नांदेड,गुरमुखसिंघ उर्फ गुरी सेवासिंघ गिल (24) रा.शहीदपुरा नांदेड,करणजितसिंघ रघबिरसिंघ शाहु (30) रा.बडपुरा नांदेड अशा सहा अटक करण्यात आली.
यांना अटक करण्यात आली.

आज दि.1 जून रोजी पोलीस विभागाने अटक केलेल्या सहा जणांना तपासीक अंमलदार पोलीस निरिक्षक संतोष तांबे आणि मोठ्या जबरदस्त पोलीस फौजफाट्याने पाचव्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी.एम.देशमुख यांच्या समक्ष हजर करून तपासासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली. यावेळी सरकारी वकील ऍड.व्ही.बी.तोटेवाड यांनी या प्रकरणातील वेगवेगळ्या 11 मुद्यांनुसार तपास करण्यासाठी ही दहा दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सादरीकर केले.युक्तीवाद ऐकून न्या.बी.एम.देशमुख यांनी या अटकेतील सहा जणांना दहा दिवस पोलीस कोठडी पाठविले.

न्यायालयात आरोपींच्यावतीने कोण्यात्याही वकीलाने वकील पत्र दिले नाही म्हणून त्यांच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी नांदेड जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाने या सहा आरोपींसाठी वकील नियुक्त केला होता.

याबद्दलची माहिती सार्वजनिक रित्या पत्रकार परिषदेतून सांगतांना पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी बियाणी हत्याकांडातील सर्व माहिती अत्यंत संवेदनशिल आहे.

या प्रकरणात आणखी बरेच जण आहेत आणि हा हत्याकांडाचा प्रकार कट रचुनच झालेला आहे. हे सिध्द झाल्यानंतर याप्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम 120(ब) आम्ही वाढवले आहे. त्यामुळे याप्रकरणातील बातमी लिहितांना चर्चा लिहिण्याऐवजी त्यातील तथ्य आपण सर्वांनी लिहावे अशी माझी अपेक्षा आहे. प्रकरणाच्या तपासासंदर्भाने मला भरपूर बाबी आज सांगता येणार नाहीत कारण या प्रकरणातील बरेच आरोपी आम्ही पुढच्या एका आठवड्यात गजाआड करू ज्या दिवशी या प्रकरणाचा अंतिम अहवाल लिहिण्याची वेळ येईल त्या दिवशी आम्ही सर्वच माहिती सार्वजनिक रित्या उघड करू. तेंव्हा आजच्या परिस्थितीत आम्ही हा गुन्हा अत्यंत व्यवसायीकपणे उघडकीस आणला आणि त्याबाबतचे यश नांदेड जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, निलेश मोरे,पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे,सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक,पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, संतोष तांबे,संतोष शेकडे, पांडूरंग माने,शिवसांब घेवारे, चंद्रकांत पवार,पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे, गंगाप्रसाद दळवी,सचिन सोनवणे,आशिष बोराटे,दत्तात्रय काळे,गणेश गोटके यांच्यासह 40 अधिकाऱ्यांनी आणि 60 पोलीस अंमलदारांनी मेहनत घेतली आहे.खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप चार जण पोलीसांच्या ताब्यात त्यांच्या संदर्भाची चौकशी सविस्तरपणे सुरू आहे.

554 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.