किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

देगलूर शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ.महिलेचा खून करून सुमारे चार लाखाचा ऐवज लुटला

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.25.जिल्यातील देगलूर शहरातील अंत्यत वर्दळीचा भाग असलेल्या लालबहादूर शास्त्री नगरात दरोडेखोरांनी एका दाम्पत्याच्या घरात धुमाकुळ घातला.वृद्ध महिलेने दागिणे देण्यास विरोध केल्याने तिची हत्या करण्यात आली या दरोड्यात जवळपास चार लाखाचा ऐवज लुटून नेण्यात आला ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांबद्दल रोष व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती अशी की,देगलूर-उदगीर या मुख्य रस्त्यालगत असलेले लालबहादूर शास्त्री नगर अंत्यत वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या नगरात तरंग बार जवळ येडूर ता.देगलूर येथील मुळ रहिवाशी असलेले पाटील दाम्पत्य राहते.

सोमवारी रात्री जेवणानंतर वृद्ध पती,पत्नी झोपले होते.रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास अज्ञात तीन दरोडेखोरांनी त्यांच्या घरात जबरदस्तीने घरात प्रवेश केला.ऐवज लुटीसाठी
घरमालक श्रीपतराव रामजी पाटील वय वर्षे ९० वर्षे व त्यांच्या पत्नी चंद्रकला भीमराव पाटील यांचे हात पाय बांधले.चाकूचा धाक दाखवून चंद्रकलाबाई यांच्याकडील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करीत असताना विरोध करताच चंद्रकलाबाई यांची हत्या केली. यानंतर गळ्यातील मनी मंगळसूत्र, सोन्याचे बोरमाळ हातातील सोन्याच्या पाटल्या, सोन्याचे कडे व चांदीचे ७० तोळ्याचे वाळे असे एकूण तीन लाख ८९ हजार रुपयाचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार झाले.

देगलूरते उदगीर या मुख्य रस्त्यावरील रस्त्याच्या बाजूला आणि रात्रंदिवस वाहने व लोकांची वर्दळ असलेल्या परिसरात दरोडा पडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.तर देगलूर शहरात वारंवार चोरी,दरोडा,खून असे गुन्हे वाढत आहेत.

या प्रकरणी श्रीपतराव रामजी पाटील यांच्या फिर्यादीनूसार देगलूर पोलीस ठाण्यात कलम ३९७,३०२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सोहन माछरे हे करीत आहेत.

71 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.