किनवट तालुक्यात नविन राजकिय बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असुन बंजारा समाजाने या नविन राजकिय बोंडअळी पासुन सावध रहावे-माजी आ.प्रदीप नाईक
किनवट ता. प्र दि २८ किनवट तालुक्यात नविन राजकिय बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असुन बंजारा समाजाने या नविन राजकिय बोंडअळी पासुन सावध रहावे यापुर्वी या अशाच बोंडअळीच्या प्रादुर्भावाने आपली सत्ता गेलेली आहे आता त्यांच्या भुलथापांना बळी पडु नका असे आवाहन माजी आमदार प्रदीप नाईक यांनी अखिल भारतीय लेंगी स्पर्धेच्या निमित्त आयोजित सत्कार समारंभात उपस्थित बंजारा बांधवांना केले.
बंजारा समाजाचे पारंपारीक लोकगित व नृत्य स्पर्धा ज्याला लेंगी स्पर्धा असे उच्चारले जाते त्या मागील अनेक वर्षापासुन सारखनी येथे दरवर्षी संतसेवालाल महाराज जयंतीच्या औचित्यावर नित्यनेमाने आयोजित केल्या जातात ज्यातुन बंजारा समाजाच्या संस्कतीचे संवर्धन केले जाते. आज दिनांक २८ रोजी आयोजित सारखणी येथिल अखिल भारतीय लेंगी स्पर्धेच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात देशाच्या विविध राज्यातुन बंजारा स्पर्धक व बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आयोजित कार्यक्रात तेलंगना येथिल लोकगाईका भिकसु नाईक, अश्विनि राठोड, संगिता जाधव यांनी गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
आयोजित कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी आमदार प्रदिप नाईक व सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांची होती तर या कार्यक्रमात सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार (भा.प्र.से) यांच्या सुविद्यपत्नी यांनी पारंपारीक बंजारा वेशभुषा परिधान करुन सहभाग नोंदवला होता त्यामुळे उपस्थितामध्ये उत्साह संचारला होता.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलतांना माजी आमदार प्रदीप नाईक हे म्हणाले कि, बंजारा समाजाचे लोप पावत चाललेली लेंगी नृत्य जतन करण्याच काम सारखणी येथिल लेंगी महोत्सवाचे आयोजक विशाल भाऊ जाधव व त्यांच्या सहका-यांचा खुप मोठा सिंहाचा वाटा असुन त्यांनी बंजारा संस्कृती जनत करण्याचे उत्कृष्ठ काम केले आहे. त्यांच्यातुन अनेकांनी प्रेरणा घेऊन असेच उपक्रम राबवावे असे आवाहन केले तर आयोजक विशाल जाधव यांना शुभेच्छा व आशिर्वाद प्रदाण केले.
कार्यक्रमांत प्रमुख उपस्थिता पैकी सहाय्याक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच पुजार यांनी आयोजकांचे स्वागत स्विकारुन बंजारा संस्कृती संवर्धनाच्या या कार्यक्रमा्ची व आयोजकांची स्तुती केली तर सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक विशाल जाधव यांनी मांडले त्यात त्यांनी बंजारा समाजाच्या इतिहासावर प्रकाश पाडले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार अर्जुन जाधव यांनी केले.
तर कार्यक्रमास जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, प्रकाश राठोड, कुंदन पवार, ठाकुर जाधव, नामदेव राठोड, भगवान बाबा, शंकर महाराज, के.जी राठोड, कुंदन राठोड, प्रविण म्याकलवार, सरपंच तोडसाम ताई, शेख सलिम शे मदार, कचरु जोशी, बाबु सेठ, पांडु जस्य्वाल, लक्ष्मण मिसेवार, यांच्यासह दोन्ही तालुक्यातील विविध पक्षाच्या अनेक पदाधिका-यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या वृत्तांकना करिता पत्रकार भिमराव पुनवटकर, विलास आडे, दुर्गादास राठोड, दिनेश चव्हाण, रशीद फाजलाणी, शे. मजहर, जयपाल जाधव, संजय जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन विशाल जाधव व त्यांच्या सहका-यांनी केले तर याच्या यशस्वीते करिता विशाल जाधव मित्रमंडळाने परिश्रम घेतले. तर कार्यक्रमात उपस्थितांचे आभार सारखणीचे उपसरपंच अंकुश जाधव यांनी मानले.