किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट शहरातील महापुरुषांच्या एकेरी नावांचा उल्लेख असलेल्या पाट्या तात्काळ बदलुन सन्मानपुर्वक पुर्ण नावांसहीत पाट्या लावण्यात याव्यात – लक्ष्मीकांत मुंडे

ता.प्रतीनिधी :
किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैक व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चाैक परीसरातील दुकानांवरील बोर्डवर असलेल्या ‘शिवाजी चाैक’ व ‘आंबेडकर चाैक’ असा एकेरी नावांचा उल्लेख असलेल्या पाट्या तात्काळ बदलुन सदरील ठिकाणी या महापुरुषांच्या सन्मानपुर्वक पुर्ण नावांसहीत ”छत्रपती शिवाजी महाराज चाैक” व ”डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चाैक” असा उल्लेख असणाऱ्या पाट्या लावण्यात याव्यात यासाठी नगरपरीषदेने उचीत कार्यवाही करण्याची मागणी किनवट तालुक्यातील सर्वपरीचीत युवा पत्रकार तसेच भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे यांनी आज दि.२८ फेब्रुवारी २२ रोजी किनवट नगरपरीषदेचे नगराध्यक्ष व मुख्याधीकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
आजच्या काळात प्रत्येकालाच जाण आहे की,या महाराष्ट्राच्या मातीत अनेक राजे महाराजे व अनेक साधुसंत तसेच महापुरुष आपल्या जनतेच्या कल्याणासाठी झटून जनतेसाठी आपले आयुष्य समर्पुण गेले. त्यांच्या पश्चात आपण त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो,पुतळे उभारतो पण त्यांचे विचार मात्र आचरणात आणत नाहीत तेंव्हा किमान आपल्या आजूबाजूच्या दुकानांच्या बोर्डवर किंवा एखाद्या छापील पत्ता असलेल्या कागदावर का होईना त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख कुठल्याही समजदार व सुसंस्कृत व्यक्तीला व समाजाला न पटणारा आहे. तेंव्हा शहरातील ”छत्रपती शिवाजी महाराज चौक” ”डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक” या परिसरातील व्यापारी बांधवांनी त्यांच्या दुकानावरील ‘शिवाजी चौक’ व ‘आंबेडकर चौक’ या नावाचा उल्लेख असलेल्या पाट्या बदलून सन्मानपूर्वक ”छत्रपती शिवाजी महाराज चौक” व डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक” असा उल्लेख करावा अशी विनंती लक्ष्मीकांत मुंडे यांनी केली आहे.
ज्या शिवरायांनी महाराष्ट्र घडवला आणि जपला ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले त्यांचा किमान सन्मानपूर्वक पर्ण नावासह उल्लेख व्हावा हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल कारण यासाठी एखादे आंदोलन उपोषण किंवा एखादा राजकीय स्टंट करावा लागेल असे शिवप्रेमी व डॉ.बाबासाहेब प्रेमी म्हणून तर वाटत नाही कारण कुठल्याही जाती धर्मातील कुठल्याही राज्यातील कुठल्याही भाषिकाला आपले श्रद्धास्थान प्रेरणास्थान असणाऱ्या महान व्यक्तींचा सन्मानपूर्वक नावाचा उल्लेख करण्यास विरोध असेल अशी आशा आणि अपेक्षा तर मुळीच नाही परंतु येत्या सात दिवसात जर दुकानावरील पाट्यांमधील महापुरुषांची एकेरी नावे काढुन जर सन्मानपुर्वक पुर्ण नावांचा ऊल्लेख नाही केला तर मात्र डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या कायद्यात राहुनच पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्धतीने ती बदलण्यात येतील या इशाऱ्यासह कळकळीची विनंती पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे यांनी नगरपरीषद प्रशासनासह व्यापारी बांधवांनाही केली आहे.
नगरपरीषद प्रशासन छत्रपती शिवरायांचा भव्य दिव्य असा पुतळा लवकरच ऊभारणार असल्याची चर्चा जोर धरु लागलेली असतानाच या एकेरी नावाचा उल्लेख असलेल्या पाट्यांच्या प्रकरणाला किती गांभीर्याने घेतेय याकडे निवेदनकर्ते भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे यांच्यासह तमाम शिवप्रेमी व बाबासाहेबप्रेमी जनतेचे लक्ष लागले आहे.

553 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.