किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

14 व 9 वर्षाखालील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी नांदेड संघाची 10 रोजी निवड चाचणी

नांदेड,दि.9
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अंतर्गत हिंगोली जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने 16 ते 18 मे 2022 दरम्यान बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत जिल्हा हिंगोली येथे आयोजित 14 वर्षाखालील मिनी सबज्युनियर व नऊ वर्षाखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठीनांदेडच्या संघाची निवड आर्चरी स्कूल नांदेड श्री गुरुगोविंदसिंग स्टेडियम येथे दिनांक 10 मे रोजी सकाळी सात वाजता होणार असून जिल्ह्यातील इच्छुक धनुर्धर यांनी सदरील जिल्हास्तर स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन संघटनेचे सचिव वृषाली पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अंतर्गत आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत इंडियन ,रिकव्हर , कंम्पाउंड प्रकारात स्पर्धा होणार असून 14 वर्षाखालील खेळाडूंसाठी 1 जानेवारी 2008 किंवा त्यानंतर जन्मलेले खेळाडू सहभाग नोंदवू शकतात तर 9 वर्षाखालील स्पर्धेत सहभाग नोंदवू इच्छित खेळाडूंसाठी 1 जानेवारी 2013 किंवा त्यानंतर जन्मलेले खेळाडू सहभाग नोंदवू शकतात . सदरील राज्यस्तरीय स्पर्धेत विजेते व उच्चतम कामगिरी करणारे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात येणार आहे सदरील राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या नांदेड संघाची निवड मुख्य प्रशिक्षिका तथा सचिव वृषाली पाटील जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली 10 मे रोजी सकाळी सात वाजता होणार असून जिल्हास्तर स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना सुवर्ण ,रौप्य ,कास्य पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .यात निवडलेला संघ वसमत हिंगोली येथील स्पर्धेत सहभागी होईल .जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी येताना सर्व खेळाडूंनी वयाचा दाखला , आधारकार्ड ,पासपोर्ट फोटो व स्वतःची किट( ईक्यूपमेन्ट) घेऊन मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील कार्याध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार गुर्दिप सिंह संधू संजय चव्हाण नारायण गिरगावकर संजय रुईकर स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे नांदेड जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष रमेश पारे यांनी केले आहे .

151 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.