रशिया मास्को येथील लोकशाहिर अण्ण भाऊ साठे पूतळाचे अनावरण सोहळा निमित्य अभार प्रदर्शन कार्यक्रम सपन्न
किनवट : रशिया येथे लोकशाहीर अण्णाणभाऊ साठे हयाचे पुतळा उभारणे म्हवणजे त्यांाच्याश कार्याचा उल्लेखनिय गौरव असून समस्त देशवासीयासाठी गर्वाची बाब आहे म्हेणून आज दिनांक १६/९/२०२२ रोजी लोकशाहिर अण्णाचभाऊ साठे पुतळा किनवट येथे अभार प्रदर्शन कार्यक्रम संपन्ना झाला आहे.
अण्णाभाऊंचे संपूर्ण आयुष्य म्हणजे एक धगधगते अग्निकुंड आहे. बालपणी, तरूणपणी, मुंबईत आल्यानंतर, डाव्या विचारांकडे आकर्षित झाल्यानंतर, अगदी रशियाला जाऊन आल्यानंतर आणि मग अखेरच्या 5-6 वर्षांत आजार आणि दारिद्र्याने अतोनात हाल होत असताना… अशा आयुष्याच्या सर्वच टप्प्यांवर त्यांनी फक्त आणि फक्त हालअपेष्टाच सहन केल्या. लौकिक सुख त्यांच्या वाटेला कधीच आले नाही. दगड फोडणे, कापडाचे गठ्ठे पाठीवर घेऊन हिंडणे, माळीकाम इ. अंगमेहनतीची आणि समाज ज्याला खालच्या दर्जाची समजतो अशी जवळपास सर्व कामे अण्णाभाऊंनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच त्यांनाही समाजातील स्पृश्यास्पृश्यता, विषमता आणि जातीय विखाराची झळ सहन करावी लागली. मात्र हा विखार त्यांनी कधीही आपल्या वागण्यात आणि लिहिण्यात डोकावू दिला नाही. उलटपक्षी आपली लेखनप्रेरणा सांगताना “इथे नंदनवन फुलावे, असे स्वप्न पाहात मी लिहितो!’’ असा उदात्त विचार ते नमूद करतात. आपले उद्दिष्ट विद्रोह नसावा तर समन्वय असावा, अशी जणू शिकवण ते देतात. आयुष्यात विखारानेच पोट जाळले गेले असूनही विद्वेषाचा स्पर्शसुद्धा मनाला होऊ न देता समता-बंधुता-स्वातंत्र्य या चिरंतन मूल्यांच्या आधारेच जीवन जगण्याचा संदेश ते आपल्या विपुल साहित्यातून समाजाला देतात. स्व. अण्णाभाऊंचे मोठेपण, श्रेष्ठत्व हे आहे. स्व. अण्णाभाऊंनी आपल्या लेखनातून आपल्या प्राचीन आणि वैभवसंपन्न संस्कृतीचा चुकूनही अपमान केलेला नाही. ही संस्कृती त्यांनी नाकारली तर कधीच नाही. अगदी डाव्या विचारांच्या संपर्कात आल्यानंतर, डाव्या चळवळीत सक्रीय झाल्यानंतर, अगदी रशियात जाऊन डाव्यांच्या तथाकथित नंदनवनाने भारावून गेल्यानंतरही त्यांनी आपली संस्कृती कधीच धिक्कारली नाही. समाजातील दलित-पीडित-वंचितांची कैफियत, त्यांची वेदना अतिशय जोरकसपणे त्यांनी आपल्या साहित्यातून मांडली. मात्र विद्रोहाचा आवाज त्यांनी कधीच उठवला नाही. कदाचित यामुळेच “ते दलित लेखक नाहीत’’ अशी हाकाटी डाव्या मंडळींकडून केली गेली. बहुधा याच रागातून स्व. अण्णाभाऊंना आयुष्याच्या अखेरच्या काळात कमालीच्या विपन्नावस्थेच जीवन कंठावे लागले. रशियाला जाऊन आल्यानंतरही त्यांना कोणत्याही भौतिक-ऐहिक सुखसोयी डाव्या विचारांच्या मंडळींनी मिळू दिल्या नाहीत.डाव्या विचारांचे मूळ अधिष्ठान हे स्थानिक संस्कृती, परंपरा नाकारणारे असते. जगभरातील अनुभव हेच सांगतो. अगदी रशियन चर्चसुद्धा कम्युनिस्टांच्या रोषातून सुटले नाही. अण्णाभाऊंनी हा मार्ग कधीच स्वीकारला नाही. रामायण, महाभारत, गीता, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, या सगळ्या संचिताबद्दल अण्णाभाऊंना अपार श्रद्धा होती. आपली संस्कृती, आपल्या परंपरा यांच्याशी त्यांची नाळ आयुष्यभर घट्टच राहिली. म्हणूनच “आपल्या संस्कृतीला शिव्या घालणे म्हणजे विद्रोही’’ या व्याख्येनुसार ते कधीच विद्रोही बनले नाहीत. गंमत पाहा, अण्णाभाऊंच्या निधनानंतर सुमारे 20 वर्षांनी अन्याय्य आणि अनैसर्गिक डाव्या विचारांचे पतन खुद्द रशियातच झाले. “धर्म ही अफूची गोळी आहे!’’ असे म्हणणारी डावी विचारधारा मृत्यू पावली. या वेळपर्यंत अण्णाभाऊ जिवंत असते तर?
अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून जनसामान्यांना काय सांगितले? त्यांच्या साहित्याचा प्रमुख संदेश आहे “अन्याय सहन करू नका, आणि कोणावर अन्याय करूही नका.’’ स्वाभाविकपणेच त्यांच्या कथा-कादंबर््या तले नायक-नायिकासुद्धा कधीही कोणावर अन्याय करीत नाहीत आणि स्वत:वरील अन्यायही सहन करीत नाहीत. त्यांचे नायक-नायिका अन्यायाच्या निवारणार्थ प्रसंगी शस्त्र हाती घेतात, परंतु ते विद्ध्वंसासाठी नाही तर अन्यायाच्या प्रतिकारासाठी घेतात. अण्णाभाऊ एके ठिकाणी लिहितात, “आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे. मांगल्य हवे आहे. मराठी साहित्याच्या थोर परंपरेचा आम्हाला अभिमान आहे. कारण मराठी साहित्याची नांदी आमच्याच जीवनसंघर्षाने झडली आहे… ज्यांनी दलितांच्या भाषेत (प्राकृतात- मराठीत) गीता लिहिली, अर्थात ज्ञानेश्वरी लिहिली ते ज्ञानेश्वर आमचे साहित्यिक आहेत. महाराचे चुकलेले मुल कडेवर घेणारे एकनाथ हे आमचे साहित्यिक आहेत.’’आपल्या संपूर्ण आयुष्यात अण्णाभाऊंनी तीन मूल्ये जीवापाड जपल्याचे आपल्या लक्षात येते. ही मूल्ये आहेत, 1. देशाचे स्वातंत्र्य, 2. महिलेचे शील आणि 3. स्वाभिमानी पुरूष या तीन मूल्यांवरच त्यांची संपूर्ण साहित्यिक कारकीर्द आणि सामाजिक आयुष्य बेतलेले आहे, हे दिसून येते.स्व. अण्णाभाऊ किती थोर महापुरुष होते याचे मोजमाप करण्यासाठी कोणतीही फूटपट्टी पुरी पडणार नाही. मात्र मृत्यूला पाच दशके उलटल्यावरही ज्याचे साहित्य वाचले जाते, ज्यापासून तरूण आजही प्रेरणा घेतात त्याला कोणत्याही उपाधीची गरजच नाही.अण्णाभाऊ डाव्या विचारांच्या संपर्कात आले. मात्र डाव्यांची संघर्षाची, भांडण्याची, तोडण्याची नकाराची भूमिका त्यांनी कधीच मान्य केली नाही. आयुष्यभर समन्वयवादी भूमिका घेऊन ते जगले. त्यांच्या मृत्यूपश्चात पाच दशकांनी आणि जन्माला शतक उलटून गेल्यानंतरही वेगवेगळ्या रूपात संघर्ष, भांडण, तोडण्याची, या देशाची, मातीची संस्कृती नाकारणार््या शक्ती डोके वर काढतच आहे. अण्णाभाऊंच्या जीवनाचाच आदर्श ठेवायचा तर याविरोधात लढण्यासाठीचे सगळ्यात प्रभावी हत्यार हे समन्वयाचे, समरसतेचे आहे. आपल्या समाजातील कोणाही घटकाला आपण नीच आहोत, असे वाटणार नाही, आपण सगळेच जण एका आईची, भारतमातेची लेकरे आहोत, असे वाटावे, अशी समाजरचना उभी करणे, ही अण्णाभाऊंना श्रद्धांजली ठरेल.
स्व. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात, 2019-20 मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन मॉस्कोमध्ये अण्णाभाऊंचा पुतळा उभारण्यासाठी हालचाली केल्या. तिथे बसविण्यासाठीचा पुतळाही मा. देवेंद्रजींनी तेव्हा बनवून घेतला होता. मुंबई विद्यापीठ आणि रशियातील एका विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मॉस्कोमध्ये पुतळा बसविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मा. देवेंद्रजींच्या अनेक सहकारी आणि मित्रांनी या कामी भरपूर मेहनत घेतली होती. या श्रमांना आज फळ आले असून मा. देवेंद्रजींच्याच हस्ते अण्णाभाऊंच्या पुतळा अनावरण मॉस्कोमध्ये झाला, हा खूपच सुखद योगायोग आहे. आपण सगळ्यांनी आजच्या या योगाचे मनापासून स्वागत करून मा. देवेंद्रजींना धन्यवाद दिले पाहिजेत हया कार्यकामात किनवट तालूक्या,चे गूत्े्ंन दार संघटनाचे अध्यचक्ष मा. अनिल तिरमनवार, मा. लक्ष्मगण माडपेलीवार, श्री शंकर भंडारे राजू मधुकर अन्नेकलवार, स्व्मी नूतपेल्लीिवार , स्वाकमी कलगोटवार, अशोक आरपेल्ली वार बापूराव माहूरकर ,श्रीनिवास राशलवार, सूरेश गूम्मीडवार, रवि दिसलवार , संजय कोतूरवार , प्रदिप दोनकोंडवार, राजू दोमटीवार , प्रशांत माहूरकर , गंगाधर दोनपेल्लीववार ,राजेद्र जयस्वााल स्लिम समन्वंयक किनवट भाग कपिल कांबळे ( अनूलोम संस्थाणचे कार्यकर्ता )रमेश राशलवार अधि समाज बांधव उपस्थील राहून लोक शाहिर अण्णभाऊ साहेब पूतळास पूष्पा) हार आर्पन करुन अभार व्य क्त केले आहे.