अज्ञात युवकाचा वैद्यकीय अधिकाऱ्यावर गोळीबार; डॉक्टर जागीच गतप्राण; आरोपी निसटून जाण्यात यशस्वी.
उमरखेड: राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सध्या कार्यरत असलेले बालरोगतज्ञ डॉक्टर हनुमंत धर्मकारे वय 45 वर्ष पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेल च्या समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञात युवकाने येऊन डॉक्टरांच्या छातीमध्ये एक व पाठीमागे तीन अशा एकूण चार गोळ्या झाडल्या ची घटना घडली आहे. यामध्ये डॉक्टर धर्मकारे यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती उमरखेड शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रमेश मांडण यांनी दिली.
तर घटनास्थळा वरून आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला आहे. यामुळे शासकीय रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाली आहे. डॉक्टर हनुमंत धर्मकारे मागील सात वर्षापासून उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत होते. या शिवाय त्यांचा उमरखेड बस स्टँड च्या समोर खाजगी बाल रुग्णालय होते.
गेल्या सात वर्षाच्या काळात त्यांची कारकीर्द ही अतिशय सर्वसमावेशक राहिलेली आहे. याशिवाय कुठल्याही वादाच्या विषयात यांचे नाव चर्चेत आले नाही. असे असताना आज अचानक त्यांच्यावर अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या छातीच्या उजव्या बाजूला एक गोळी तर पाठीमागे तीन गोळ्या अशा एकूण चार गोळ्या त्या युवकांनी त्यांच्यावर झाडल्या यामध्ये डॉक्टर धर्मकारे रक्ताच्या थारोळ्यात पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
शहरातील शासकीय उत्तरवार रुग्णालयाच्या जवळच असलेल्या गोरखनाथ हॉटेल येथे चहा पिण्यासाठी ते नेहमीच जात असत. आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आपल्या मोटरसायकलने ते त्याच्या खाजगी दवाखान्या कडे जात असताना एका अज्ञात व्यक्तीने यांच्यावर बंदूक रोखून छातीवर गोळ्या झाल्या त्या वेळी आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो अज्ञात युवक त्यांच्या शाईन गाडी ने भरधाव वेगाने पसार झाला असल्याचे यावेळी प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. यावेळी त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉक्टरला नागरिकांनी उचलून येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या हल्ल्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती येथील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रमेश मांडण यांनी दिली.
ही घटना शहरात वार्यासारखी पसरली यावेळी नागरिकांनी येथील शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली विशेष म्हणजे आज माजी गृहराज्यमंत्री आमदार रणजीत पाटील हे उमरखेड च्या दौऱ्यावर असताना त्यांनाही ही घटना समजली त्यांनी त्या यावेळी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत आमदार नामदेव ससाने, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा याशिवाय माजी आमदार विजय खडसे जिल्हा परिषद सदस्य चिंतागराव कदम हे सुद्धा या वेळी उपस्थित होते. दरम्यानच्या काळात वातावरण शांत ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, उमरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत विशेष म्हणजे मागील आठ दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी उमरखेड शहरात तणावग्रस्त स्थिती असतांना त्यातच उमरखेड पोलिस बंदोबस्तात असतानासुद्धा भर दिवसा रस्त्यावर हा गोळीबार झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था यावर सामान्य नागरिकांचा असंतोष निर्माण झाला आहे