अतिक्रमण त्वरित पाडुन रस्ता खुला करावा- मुख्याअधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन
किनवट : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार किनवट शहरातील बेलोरी डि.पी.रसतावरील रेल्वे गेट जवळची सर्वअवैध अतिक्रमणे जवळपास पालिका प्रशासनाने महिन्याभरापूर्वी काढली असुन एक अतिक्रमण अद्यापही या रस्त्यावर शिल्लक आहे.आपल्या सातबारा नुसार जमिन असतानाही डि.पी.रसतावर अतिक्रमण करून कब्रस्तान ची भिंत बांधून रस्ता बंद करण्यात आलं आहे. हे अतिक्रमण मात्र तसेच ठेवलं असल्याने हा रस्ता अद्याप खुला झाला नाही.हे अतिक्रमण पाडुन रस्ता खुला करावा अशी मागणी शिवसेनेचे नेते माजी नगराध्यक्ष सुनील पाटील सहित अनेक शेतकऱ्यांनी पालिका प्रशासनाला निवेदन देवून केले आहे. शहरातुन बेलोरी या वार्डा कडे आणि या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना शेतात जाण्या- येण्यासाठी जुना हा रस्ता आहे. या डि.पी.रसतावरील बहुतांश अतिक्रमणे पालिका प्रशासनाने न्यायालयीन आदेश नुसार महिन्याभरापूर्वी काढली असुन अतिक्रमण धारकांना घरांसाठी पर्यायी तात्पुरती जागा देण्यात आली आहे. डि.पी.रसतालगत असलेल्या खोजा कब्रस्तान ने आपली जमीन कायम असतानाही डि.पी.रसतावर अतिक्रमण करून रस्ता बाधीत केला आहे.हेही अतिक्रमण त्वरित पाडुन रस्ता खुला करावा अशी मागणी या परिसरातील शेतकरी व बेलोरी वार्डातील नागरिकांनी नगरपरिषदेचे मुख्याअधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन देवुन केले आहे.या निवेदनावर माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, माजी नगरसेवक लक्ष्मण माडपेलीवार, माजी नगरसेवक रामराव ईटकेपेलीवार,माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, सुनील पिसारीवार,नागेश सलाम, सुभाष चाडावार, किशनराव नेमानीवार, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष किरण किनवटकर,प्रमोद जोनपेलीवार,माधव पिसारीवार, मुकुंद राव तिरमणवार,अशोक जलगमवार,मधुकर नेमानीवार,व्यंकट पोशटी, सुनीलराव आयनेनीवार,राजु नेमानीवार, रामलु तुकारेडीवार,नरेश कटावार,देवणा भीमणवार,सहीत विविध ३८शेतकऱ्यांचया स्वाक्षऱ्या आहेत.