मोबाइलवरून शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या जि.प शिक्षकावर गुन्हा दाखल
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.10.जिल्यातील मुखेड तालुक्या मधील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने एका विवाहित महिलेशी तू मला खूप आवडतेस,मला झोप येत नाही, असा संवाद करून शारीरिक सुखाची मागणी केली.
याबाबत मुखेड ठाण्यात ८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे.शिक्षकी पेशाकडे आपण आदराने पाहतो.शिक्षक तर आपणा सर्वांसाठी गुरुस्थानी असतात.शिक्षणाच्या माध्यमातून सुशिक्षित,सुसंस्कारित पिढी घडविण्याचे महान कार्य शिक्षक करतात.परंतु,काही शिक्षक मात्र या पवित्र कार्याला काळीमा फासण्याचे काम करत आहेत.
अशीच एक घडलेली घटना शिक्षण क्षेत्रासाठी लाजिरवाणी आहे.मुखेड तालुक्यातील पांडुर्णी येथील रहिवासी व पाळा केंद्रांतर्गत रेखू तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मारोती पांडुरंग सूर्यवंशी (वय ३५) यांनी पांडुर्णी गावातील ३० वर्षीय विवाहित महिलेस “मला तू मागील सहा वर्षांपासून खूप आवडतेस.माझी पत्नी नांदेडला राहते. मला झोप येत नाही.अशा शब्दांत विवाहित महिलेशी संवाद केला.पतीला सांगू नकोस,तुला माझं बोलणं आवडत नसेल तर मला माफ कर,असा संवाद ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता मोबाइलवरून करून शारीरिक सुखाची मागणी केली.
यानंतर या विवाहित महिलेने ही घटना आपल्या पतीला सांगितली. पतीसह महिलेच्या म्हणण्यानुसार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी मुखेड पोलिसात कलम ३५४ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक भारत जाधव हे करीत आहेत.