किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

आझाद मैदानवरील मातंग समाजाच्या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सामील व्हावे – सतीश कावडे

नांदेड दि. 9 –
अनुसूचित जातीसाठी असलेल्या 13% आरक्षणाचे अ,ब,क,ड. असे वर्गीकरण मंजूर करावे, लहुजी साळवे अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात यावी, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास निधी उपलब्ध करून देऊन हे महामंडळ चालू करावे, मातंग समाज व तत्सम वंचित मागास जातींसाठी स्वतंत्ररित्या आर्टी (अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था) ची निर्मिती करण्यात यावी, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न या पुरस्काराने मरणोत्तर गौरविण्यात यावे, आरक्षणासाठी बलिदान देणारा मातंग युवक संजय ताकतोडे यांच्या कुटुंबास शासनामार्फत 50 लक्ष रूपयांची मदत करावी व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नौकरी द्यावी, या आणि इतर जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी राज्यातील मातंग समाज आणि विविध सामाजिक संघटना या गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलने, मोर्चे, मेळावे, परिषदा घेऊन शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु राज्यातील आघाडी शासन, युती सरकारे हे मातंग समाजाच्या या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मातंग समाजामध्ये चिड आणि असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
मातंग समाजाची सर्व क्षेत्रात होणार्‍या उपेक्षांचा जाब विचारण्यासाठी आझाद मैदान, मुंबई येथे दि. 22 फेब्रुवारी रोजी सकल महाराष्ट्र मातंग समाजाचे जवाबदो आंदोलन छेडले जाणार आहे. त्यानुषंगाने नुकतीच नांदेड येथे बैठक होऊन मुंबईत होणार्‍या जवाबदो आंदोलनात चळवळीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या आंदोलक अशा नांदेड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन सतीश कावडे, शिवा कांबळे, दलित मित्र रामराव सूर्यवंशी, लालबाजी घाटे, डॉ. माधवराव लोकडे, डॉ. गणपतराव जिरोणेकर, भारत कलवले, परमेश्वर बंडेवार, संजय गोटमुखे, प्रा. इरवंत सूर्यकार, बालाजी पाटोळे, देवीदास इंगळे, शिवाजी नुरूंदे, आकाश सोनटक्के, नागेश तादलापूरकर, किशोर कवडीकर, बालाजी देवके, गंगाधर खुणे, नरसिंह वझरकर, उत्तम सूर्यवंशी, गोपीनाथ सूर्यवंशी, देवराव तलवारे, सुरेश कांबळे, विक्की गोरे, पप्पू कहाळेकर, रामदास बार्‍हाळीकर, राज सूर्यवंशी, चिराग घायाळे आदींनी बैठकीद्वारे व प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

330 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.