किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मातंग समाज अन्याय निवारण समिती च्या राज्यसमन्वयकांची दोन दिवशीय महत्त्वपूर्ण बैठक पुणे येथे संपन्न.

पुणे: मातंग समाज अन्याय निवारण समिती च्या राज्यसमन्वयकांची दोन दिवशीय महत्त्वपूर्ण बैठक अगदी उत्साहात आणि आनंदी वातावरणात ,हसत खेळत विजय घोरपडे सर यांच्या शाळेत बैठक पार पडली.
बैठकीला एकूण ११सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शिवजयंती साजरी करून करण्यात आली.
त्यानंतर सर्व सदस्यांनी आपापला परिचय करून दिला. समिती ने मागील कार्यकाळात केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच समिती च्या च्या ध्येय,उद्दिष्टे नियमावली याची उजळणी करण्यात आली. त्यावरील प्रत्येक मुद्द्यावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.प्रत्येक सदस्याने आपले अभ्यासपूर्ण मते मांडली.पहिल्या दिवशी दुपारी ३वाजल्यापासून रात्री ९वाजेपर्यंत अशी सलग सहा तास बैठक झाली.

यादरम्यान समाजामध्ये आलेली मरगळ झटकून व्यापक समाजहिताच्या दृष्टीने तरुण-तरुणी ला सामाजिक समितीत जोडण्यासाठी कमिटमेंट करण्यात आली.
विशेष म्हणजे सारेजण समरस्तेने बैठकीत सहभागी झाले होते.दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी १०.००वाजता बैठकीस सुरुवात झाली मातंग अन्याय निवारण समिती आगामी काळात समाजहिताच्या दृष्टीने कशी व्यापक करता येईल समितीच्या वाढीसाठी काय उपाय योजना राबविण्यात याव्यात याची चर्चा झाली. समिती च्या जमा खर्चाचा लेखा-जोखा सादर करण्यात आला .शेवटी विलास साबळे यांनी या बैठकीचा सविस्तर आढावा सादर केला.तसेच पुणे जिल्हा संघटक म्हणून संगीता रमेश जाधव यांची निवड करावी असा प्रस्ताव क्षिरसागर सर यांनी समितीसमोर ठेवला यास सर्व समनवयकांनी प्रस्तावास मान्यता दिली. व त्यांची निवड पुणे जिल्हा महिला संघटक म्हणून करण्यात आली. शेवटी राजू आडागळे सरांनी सर्वांचे आभार मानले.

सदरील बैठकीस टी.एस.क्षिरसागर, (सोलापूर)भास्करदादा नेटके,विजय घोरपडे, राजू आडागळे (पुणे)विलास साबळे, सिंदखेड राजा (बुलढाणा)ऍड.प्रशांत कोंगे(वाशीम),आत्माराम गायकवाड (हिंगोली) आनंद भालेराव(किनवट नांदेड)मधुकर खिल्लारे (उस्मानाबाद),माधव गवळी,नरेश वाघमारे सर(मुंबई),संगीता रमेश जाधव(पुणे)आदी राज्य समन्वयक उपस्थित होते.

541 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.