किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

स्व.रावसाहेब अंतापुरकर साहेब गेले पण जनतेचे वचन पूर्ण केले

देगलूर  (बसवंत जाधव आलूरकर ).

आ.रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधीतुन देगलुर बिलोली मतदारसंघातील गंभीर रुग्णांना देगलुर बिलोली तसेच नांदेङ या ठिकाणी नेण्यासाठी आमदार निधीतून 5 रुग्णवाहिका मंजुर केल्या होत्या. आज त्या रुग्णवाहिकेंचे लोकार्पण आमदार अमरभाऊ राजूरकर व भावी आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम साहेब, तहसीलदार विनोद गुंडमवार साहेब, वैद्यकीय अधिकारी डॉ आकाश देशमुख, शिक्षण सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती रामराव नाईक,नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार, माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर, काँग्रेस शहराध्यक्ष शंकरराव कंतेवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रितम देशमुख हणेगावकर,माजी शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरुजी, बांधकाम सभापती अनिल अण्णा बोन्लावार, नगरसेवक बालाजी टेकाळे,शैलेश उल्लेवार, दीपक शहाणे, जि प सदस्य बंदखडके, कृषी उ बा सभापती गिरिधर पाटील, उपसभापती बालाजी पा थडके, काँग्रेस विधानसभा अध्यक्ष जनार्दन बिरादार, काँग्रेस सोशल मिडिया विधानसभा अध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर, डॉ धुमाळे, आदी उपस्थित होते,
या रुग्णवाहिका देगलुर बिलोली तालुक्यातील मरखेल, हणेगाव ,शहापुर ,सगरोळी,लोहगाव बिलोली तालुक्यातील सगरोळी, लोहगाव,या ठिकाणी असणाऱ्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अतिशय जलदगतीने हा निर्णय स्व.आ.रावसाहेब अंतापूरकर साहेब यांनी घेतला होता.या निर्णयाचे समाजमनातून स्वागत होत आहे. गरजू रुग्णांना प्राण वाचवण्यासाठी आवश्यक त्या सेवा वेळेत मिळण्यासाठी या सुविधेचा खूप फायदा होणार आहे.

197 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.