हदगांव शहरात मोकाट जनावरामुळे नागरिक त्रस्त ; नगर परिषद कुंभकर्ण झोपेत
हदगाव/कैलाश तलवारे
शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांची सख्या वाढत असून शहरात मार्केट लाइन ते वार्डात गल्ली पर्यंत लहान मोठया मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिसून येत असून तसेच मोकाट कुत्रे सुद्धा मोठया प्रमाणात दिसून येत आहेत या संदर्भात वारंवार बातम्या प्रकाशित केल्या परंतु याकडे येथील नगर परिषद प्रशासन दिवसेंदिवस दूर लक्ष करीत आहे या मोकाट जनावरामुळे मार्केट लाईनला तर कधी गल्ली गल्ली मध्ये मोठं मोठया जनावरामध्ये झूबंड होत असून ते झूबंड एक एक तास चालते या झुबडी मध्ये नागरिकाचे दुचाकी आदी वाहनांची मोठया प्रमाणात नुकसान होत आहे या झुबडी मुळे नागरिकांना जीवित हानी होण्यास नाकारता येत नाही त्या मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नगर परिषदला वारंवार बंदोबस्त लावण्याची सूचना केल्या असता अद्याप कोणतेच पर्याय केलेले दिसून येत नाही. जगभरात कोरोना नावाच्या वायरल ने थेंमान घातले असून नागरिक आदीच भयभीत झालेला आहे असेच वातावरण या मोकाट जनावरांमुळे दहशत निर्माण झालेली दिसून येत आहे या मोकाट जनावराची नगर परिषदने तात्काळ विल्लेवाट लावल्यास येणारे संकट टाळू शेकेल असे येथील नागरिकांकडुन बोलले जात आहे