किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

1 डिसेंबरपासून स्वस्त धान्य दुकाने चालू ठेवा ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉप किपर फेडरेशनचे आवाहन

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.24.महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. ना.छगनरावजी भुजबळ यांच्याशी दि. 22/11/2021 रोजी मुंबई मंत्रालयात बैठक घेण्यात येऊन रास्तभाव दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यावर अभ्यास गटाची निर्मिती करुन रास्त भाव दुकानदारांच्या न्याय मागण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मा. अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी दिले आहेत.मंत्रालयात झालेल्या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सदरील बैठकीस ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉप किपर फेडरेशनच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

दि.1 डिसेंबर 2021 पासून अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांनी रास्त भाव दुकानदारांचा राज्यव्यापी बंद घोषित केला असून सदरील निर्णयाला फेडरेशनने विरोध दर्शविला आहे.

जगामध्ये कोरोना साथ असताना नागरिक आर्थिकदृष्ट्या नागवला गेला आहे. गरीब नागरिकांना रोजगार मिळत नाही.

त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी हे रेशन दुकानावरच अवलंबून आहेत.केंद्र सरकारने बुधवारी केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत पुढील चार महिने मार्च 2022 पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने करीता मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे रास्त भाव दुकानदारांकडून शिधापत्रिका धारकांनी गैरसोय होऊ नये, व त्यांना कोरोना महामारीत वेळेवर धान्य उपलब्ध व्हावे यासाठी दि. 1 डिसेंबर 2021 पासून होणार्‍या बंदमध्ये सहभगी होता कामा नये, असे निवेदन मा.अन्न व नागरी पुरवठा मंत्री,प्रधान सचिव, जिल्हाधिकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी,तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

तरी जिल्ह्या तील रास्त भाव दुकानदारांनी आपली दुकाने माहे डिसेंबर 2021 मध्ये चालू ठेऊन शिधापत्रिकाधारकांना नियमित व मोफत धान्याचे वाटप करण्याचे आवाहन ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉप किपर फेडरेशनचे बाबुराव म्हमाणे,जनरल सेक्रेटरी,शहाजी लोखंडे,विभागीय अध्यक्ष,पुणे,शाहुराज गायकवाड,सहसचिव,नांदेड जिल्हाध्यक्ष अशोक जयंतराव एडके,कार्याध्यक्ष अब्दुल सलीम अब्दुल मुनीर,उपाध्यक्ष अशोक गायकवाड,कोषाध्यक्ष बळवंत सूर्यवंशी,जिल्हा सरचिटणीस अनिल कुलकर्णी,मो.जुनेद, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर उकरंडे,शहराध्यक्ष ताहेर खान, शहर उपाध्यक्ष मो,जमिल,शहर कोषाध्यक्ष मो.मुजाहीद, मो. फारुख,अब्दुल नदिम अब्दुल सलीम,देविदास दगडे,सुनील पटकोटवार,मो. शारेख यांच्यासह पदाधिकार्‍यांनी केले आहे

139 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.