सेवा समर्पणाचे प्रतीक रामदास पाटील; डॉक्टर होण्यासाठी मिळवून दिली चार लाखांची मदत
नांदेड, बातमी24:-शासकीय सेवेतून सामाजिक कार्याचा पताका नांदेड व हिंगोली जिल्ह्यात शिखरापार घेऊन जाणारे रामदास पाटील सुमठाणकर यांनी स्वेच्या निवृत्तीनंतर हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामाचा धडाका लावला आहे.यातून रामदास पाटील यांनी एक अत्यंत गरीब घरातील मुलाचे डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला बळ दिले आहे.तब्बल चार लाखांहून अधिक रक्कम पाटील व त्यांच्या मित्रपरिवाराने मिळवून दिली आहे.
लोहा येथील लक्षमीकांत कहाळेकर या मुलाचा एमबीबीएस साठी जळगाव येथील सेमी मेडिकल कॉलेज येथे नंबर लागला.मात्र घरा आठराविश्व दारिद्र्य,आठ वर्षापूर्वी वडिलांचे छत्र हरपले,यात वडिलांचा आधार हरपलेल्या लक्ष्मीकांत याने जिद्दीने शिक्षण घेतलं. आई स्वातीबाई या शिलाईकाम करतात,अशा बिकट परिस्थितीत डॉक्टर होण्याचे स्वप्न कसे पूर्णत्वास जाणार हा यक्ष प्रश्न त्यांच्या कुटूंबियांना पडला होता.
या मुलाच्या मदतीला धावून जाण्याचे काम लोहा येथील पत्रकार हरिहर धुतमल पाणी निर्णय घेतला. मदतची बातमी त्यांनी काही दैनिकांच्या माध्यमातून प्रकाशजोतात आणली.
या बातम्याची दखल घेत रामदास पाटील सुमठाणकर यांनी त्यांची यंत्रणा लोहा येथे पाठवून सत्य परिस्थिती जाणून घेतली,आणि एक दिवसात सर्व त्यांच्या अधिकारी मित्रमंडलीच्या मदतीने चार लाख 35 हजार रुपयांची मदत त्या मुलाच्या खात्यावर वर्ग केली. या मदतीमुळे लक्ष्मीकांत याचे डॉक्टर होण्याचे स्वप्नं साकार होण्यास मदत होणार आहे.या परिवाराकडून रामदास पाटील व त्यांच्या अधिकारी सोबत इतर ज्या कुणी सहकार्य केले व्यक्तीचे आभार मानले.
—