आयटी क्षेत्रातील संधी या विषयावर व्याख्यान संपन्न
किनवट:बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 06 जानेवारी रोजी आय सी टी हॉलमध्ये
स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाणिज्य विभागाच्या
वतीने आयटी क्षेत्रातील संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. शिवराज बेंबरेकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जाधव सेवा संगणकांचे संचालक, विठ्ठल राठोड, मीनाक्षी पदमावार, यांच्यासह संस्था समन्वयक प्रा. राजकुमार नेम्मानीवार, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. पंजाब शेरे, वाणिज्य विभागाच्या प्रा. डॉ. शुंभागी दिवे विचारमंचावर उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जाधव म्हणाले की, आयटी क्षेत्रात वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपला विकास साधावा तसेच आयटी क्षेत्रातील प्रगतीशील उपक्रम कसे आहेत याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली याक्षेत्रातील प्रगतीसाठी करावे लागणारे कार्य प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी अॅबकसच्या विविध पध्दतीने समजावून सांगून विषयज्ञानाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डाॅ.शुभांगी दिवे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. आम्रपाली हटकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा. सुबोध गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी संकेत दरडे ,सालेहा शेख ,राणी चंदनकर ,ऋतिका बामणे आदि उपस्तीत होते. व्याख्यानाचे आयोजन वाणिज्य विभागाच्या डॉ .शुभांगी दिवे व डॉ.आम्रपाली हटकर यांनी केले