सामाजिक न्याय विभागाच्या योजना पासून मातंग समाज वंचित ःउपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांना लहू सेनेचे निवेदन
नागपूर ः सामाजिक न्याय विभागा मार्फत असलेल्या सवलती आणि योजना मातंग समाजा पर्यत पोहचत नाहीत , त्या कडे सामाजिक न्याय विभागांचा योजनांचा लाभ मिळवा या करिता सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांना लहू सेने चे प्रमुख संजय कठाळे यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दादासाहेब गायकवाड स्वाभिमान भूमिहीन योजना लाभ नागपूर जिल्ह्यात मातंग समाजाला मिळालेला नाही .
या योजनेतून प्रत्येक भूमिहीन मातंग समाजातील कुटूंबाला 4 एकर ओलीत तर 4 एकर कोरडवाहू जमिन देण्यात येते , परंतु सामाजिक न्याय विभागा तर्फे नागपूर जिल्ह्यात एकाही मातंग समाजातील कुंटूंबाला जमीन मिळालेली नाही .शासनाच्या आदेशाचे अंमल बजावनी करण्यात आली नाही,
ग्रामीण व शहरी भागातील मातंग समाजाला 25 टक्के घरकुल योजना देण्यात यावे , असे महाराष्ट्र शासनाचे आदेश असून सुद्धा हजारो बेघर मातंग समाजाला घरकुल योजनेचा फायदा मिळालेला नाही.
मातंग समाजाला युद्ध पातळीवर घलकुल योजना देण्यात याव्यात.
सामाजिक न्याय विभागा तर्फे मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेस रू,15 कोटी रूपये देण्यात यावे.
बँन्ड कलावंताना दरमहा 5000 रूपये मानधान देण्यात यावे.
बँन्ड व्यवसाय करणाऱ्यांना गठई कामगार प्रमाणे त्याच धर्तीवर स्टाॕल देऊन रु.10 लाख देऊन आर्थिक प्रवाहात आना.
मातंग समाजातील पोटजातीला- मांग- गारुडी, मादीगा, मादगी , होलार , या समाजाला पारधी समाजाच्या धर्तीवर विशेष पॕकेज देण्यात यावे.
बार्टीच्या वेबसाईट वर साहित्य भुषण अण्णाभाऊ साठे यांचे नाव व फोटो नाहीत ते टाकण्यात यावे.
शिष्ट मंडळाचे नेतृत्व लहू सेना प्रमुख संजय कठाळे यांच्या सर्व श्री.प्रविण चव्हाण , सुशिल बावने , राज संतापे, दिपक गायकवाड , महेन्र्द प्रधान , रंदिप बावने , क्रिष्णा बावने , दिपक पवार , सागर जाधव , राजु साळवे , संजय रमेश कठाळे , प्रकाश वानखेडे, खुशाल लोखंडे , नरेशकुमार चव्हाण , अंकूश चन्ने , रुपेश वानखेडे , शैलेश बावने , मारोती वानखेडे , सचिन ठोसर , रवि पाखमोडे , मनोहर कांबळे , रोशन लांजेवार , हेमंत खडसे, शुभम खडसे ईत्यादी उपस्थित होते .