*माता साहेबदेवाजी यांच्या आशीर्वादाने सेवाकार्य संत बाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले* *भव्य नगरकीर्तन यात्रेने सांगता*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.9.हजुरसाहिब येथील पवित्र भूमीवर गुरुद्वारा मातासाहेब देवाजी यांचा सतयुगी तपोस्थान असून येथे माताजीच्या आशीर्वादाने दरवर्षी जन्मोत्सव साजरा होत आहे. येथे जन्मोत्सव साजरा करण्यासाठी हजारोच्या संख्येत भविकगण येताहेत.खालसा पंथाच्या माता यांचा हा स्थान असून येथे सेवाकार्य करण्यात एक वेगळाच आनंद मिळते असे प्रतिपादन संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवा वाले बाबाजी यांनी रविवारी, दि.9 ऑक्टोबर रोजी गुरुद्वारा मातासाहिब देवाजी यांच्या जन्मोत्सव समारोप सोहळा कार्यक्रमात केले.
कार्यक्रमात तखत सचखंड हजुरसाहिबचे मीत जत्थेदार संत बाबा ज्योतिंदरसिंघजी,सहायक जत्थेदार संत बाबा रामसिंघजी, हेडग्रंथी भाई कश्मीरसिंघजी, मीतग्रंथी भाई गुरमीतसिंघजी, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले,संतबाबा गुरदेवसिंघजी (तरना दल आनंदपुरसाहिब),जत्थेदार संतबाबा मानसिंघजी बूढा दल 96 करोडी, जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी मातासाहिबवाले, संत बाबा बंतासिंघजी कथाकार सह धार्मिक मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होती.
संतबाबा नरिंदरसिंघजी आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की दरवर्षी मोठ्या श्रद्धाभावाने मातसाहिब देवाजी जन्मोत्सवाचे येथे आयोजन होत असते.मी स्वतः आणि संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले आणि संतबाबा तेजसिंघजी तसेच भक्तांच्यावतीने कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्यापरिने योगदान देतो. येथे यानिमित हज़ारों भविकांना येण्याची संधी लाभते.तीन दिवसात येथे भक्तीचा जागर होतो आणि एक आध्यात्मिक संदेश प्रसारित होतो.
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या-ज्या घटकांचे सहकार्य लाभते त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे.
संतबाबा बंतासिंघजी यांनी श्री. गुरु गोबिंदसिंघजी यांचे नांदेड आगमन आणि माता साहिब देवाजी यांच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या लंगर आणि सेवाभावाचे उल्लेख आपल्या कथानकात केले.बाबा बंतासिंघ म्हणाले,श्री गुरु गोबिंदसिंघजी ईश्वर स्वरुप होते आणि माताजी यांनी त्यांच्यासाठी लंगरसेवा करून नांदेडच्या पावन भूमीत आध्यात्मिक सेवाकार्यांची मुहूर्तमेढ रोवली. शीख इतिहासात या घटनेची नोंद झाली पाहिजे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात सर्व संत मंडळी आणि अतीथींचे सिरेपाव देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमात माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले,गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष लड्डूसिंघ महाजन, माजी सचिव रणजीतसिंघ कामठेकर, नगर सेवक व माजी सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले,गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य राजिंदरसिंघ पुजारी,ज्ञानी गुरपिंदरसिंघ कथाकार,गुरमीतसिंघ बेदी, राजसिंघ रामगडिया,ऍड. सुरिंदरसिंघ लोनीवाले इजी. हरविंदर सिहं संधू,यांच्या सह मोठ्या संख्येत भाविक मंडळी उपस्थित होती.
जन्मोत्सव कार्यक्रमाची सांगता नगरकीर्तन यात्रेने झाली. दुपारी 2 वाजता दरम्यान गुरुद्वारा मातासाहिब येथून भव्य अशी नगरकीर्तन यात्रा काढण्यात आली. यात्रेत निशान साहिब,घोडे,गतका जत्थे,कीर्तन जत्थे,बैंडपथक आणि विविध दलांचे निहंग सिंघ उपस्थित होते.
वरील यात्रा मातासाहिब येथून निघून हीराघाट,ब्राह्मणवाडा,त्रिकूट, गडेगाव,मालटेकडी,नमस्कार चौक,महाराणा प्रतापसिंह चौक, नंदीग्राम सोसायटी,बाफना चौक, भगतसिंघ रोड,अबचल नगर, जूना मोढा,गुरुद्वारा चौरस्ता, गुरुद्वारा रोड मार्गाने उशिरा रात्रि तखत सचखंड हजुरसाहिब येथे पोहचली.असे मोदी रविंद्र सिंघ यांनी माहिती दिली आहे.