किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

कायद्याचे अधिराज्य, शांतता व सुव्यवस्था निर्माण होण्यासाठी पोलीस स्टेशन किनवट येथे तक्रार निवारण कक्षाची स्थापना.

किनवट (तालुका प्रतिनिधी)
किनवट तालुका हा अति दुर्गम भाग असून या भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सुखात शांततेत व आनंदात स्वतःचा सर्वांगीण विकास करून घ्यावा यासाठी शासनाच्या आदेशाने किनवट पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सविधान दिनाचे औचित्य साधून दिनांक 26/ 11 /2022 रोजी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली या कक्षाच्या स्थापनेच्या उद्घाटनप्रसंगी पंच म्हणून किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माननीय साळुंखे साहेब ,तसेच समाजातील प्रतिष्ठित आदरणीय व्यक्ती तथा पत्रकार श्री फुलाजी गरड (पाटील) पत्रकार गोकुळ भवरे, पत्रकार विलास सुर्यवंशी, आशिष देशपांडे , पत्रकार तुपेकर सर पत्रकार पोहरकर, तसेच पोलिस स्टेशन चे कर्मचारी, आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटनपर कार्यक्रमाचे मनोगत व्यक्त श्री विलास सूर्यवंशी यांनी केले या मनोगोतामध्ये धर्म म्हणजे कायदा कायद्याचे अनुपालन करणे म्हणजेच धर्माचे अनुपालन करणे होय प्रत्येक नागरिकांनी स्वताच्या धर्माचे अनुपालन केले की कायद्याचे अनुपालन आपोआपच होते असे गौरोद्गार श्री विलास सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन पर केले.

तसेच स्थानिक पातळीवरील तंटे हे स्थानिक पातळीवरच सोडविले गेले पाहिजे जेणेकरून आपण सुजलाम सुफलाम तसेच सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी किंबहुना येणारी पिढी ही सुखी जीवन जगण्यासाठी सदर तक्रार निवारण कक्षाची स्थापना झालेली आहे असे गरजू अमूल्य अद्वितीय मार्गदर्शन श्री विलास सूर्यवंशी यांनी बोलले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बोंडलेवाड साहेब यांनी केले सदर तक्रार निवारण कक्षामध्ये ॲट्रॉसिटी सह पाणी विषयक तंटे, विहीर विषयक तंटे, तसेच मालमत्ता विषयक तंटे, सोडवण्यात आलेले आहेत सदर कक्ष हा स्थानिक पातळीवर तंटे सोडवण्यासाठीच कारणीभूत होवो अशी अपेक्षा मतभेद असलेल्या पक्षकारांनी व्यक्त केलेली आहे तंटा सोडवलेले सर्वच नागरिक समाधानी व कुतुहूल मनाने तंटा सुटल्यानंतर आपले वापस जात होते एक वेगळाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर निर्माण झाला होता जो भाव येणाऱ्या पिढीसाठी आनंद व सुख देणार होता..

55 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.