श्री गजानन महाराज यांच्या १४४ व्या प्रगटदिनाच्या औचित्यावर किनवट येथिल मंदीरात अखंड हरीणाम सप्ताह चालू आहे. २३ फेब्रुवारी रोजी प्रगटदिन असून त्यानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
किनवट/प्रतिनिधी— शेगांव पुण्यभूमितील भाविकांचे आराध्यदैवत थोरसंत श्री गजानन महाराज यांच्या १४४ व्या प्रगटदिनाच्या औचित्यावर किनवट येथिल मंदीरात अखंड हरीणाम सप्ताह चालू आहे. २३ फेब्रुवारी रोजी प्रगटदिन असून त्यानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने अखंड हरीनाम सप्ताहाची परंपरा कायम राखली, हे विशेष.
किनवट येथिल श्री गजानन महाराज मंदीरात १६ फेब्रुवारी पासून अखंड हरीनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे. ह.भ.प.दिनेश महाराज औरंगाबादकर यांचा सप्ताहादरम्यान संगीतमय रामकथेचा कार्यक्रम चालू आहे. दररोज रात्री ७ ते ९ कीर्तन आणि त्यानंतर विविध भजनी मंडळांकडून हरीजागरण केले जात आहे. पहाटे काकडा भजन, सकाळी गाथ्यावरील भजन, संध्याकाळी हरीपाठ असे भरगच्च कार्यक्रमांनी परिसर दुमदूमला आहे.
आजपासून (२१ ते २३ फेब्रुवारी) तीन दिवस महालक्ष्मी यज्ञ चालणार आहे. वेदपठण व महापूजण दिनेशशास्त्री व त्यांची टीम करीत आहे. प्रगटदिनाच्या दिवस्यी शहरात गजानना महाराजांच्या पालखीची भजनी मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक निघणार असून २४ रोजी दुपारी १२ ते २ वाजताचे दरम्यान ह.भ.प.नारायण महाराज माधापूरकरांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. सप्ताहात गायिका वर्षा माने, मृदंगवादक बी.एल.कागणे, हार्मोनियम वादक तुकाराम माने, गायक नागनाथ बसवदे, संतोष चोले, अर्चना चोले, व्यंकट बोलेनवार, केशव नैताम, पांडूरंग मुंडे यांच्या भजनीमंडळाने सहकार्य केले. काल्याच्या कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन गजानन महाराज मंडळातर्फे करण्यात आले आहे.