आंतर जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धेत किनवट तालुक्यातील मौजे अंबाडी येथील सौ नेहा जाधव पेरके व अक्षय पंडलवार यांनी सुवर्ण अजिंक्यपद पटकाविले
किनवट ( प्रतिनिधी)
पुणे जिल्हा स्क्वेस रॅकेट संघटना आणि महाराष्ट्र राज्य स्क्वेस रॅकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धेत किनवट तालुक्यातील मौजे अंबाडी येथील सौ नेहा जाधव पेरके व अक्षय पंडलवार यांनी सुवर्णपदक प्रथम येऊन सुवर्ण अजिंक्यपद पटकाविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
पुणे जिल्हा स्क्वॅस रॅकेट संघटना आणि महाराष्ट्र राज्य स्क्वेस रॅकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या कालावधीमध्ये पुणे येथे अंतर जिल्हा राज्यस्तरीय स्क्वेअर स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील पुणे, मुंबई,उपनगर,ठाणे,औरंगाबाद, नागपूर,जळगाव,अकोला, अमरावती,रायगड,सांगली, परभणी,सोलापूर,वाशिम,जालना, वर्धा ,धुळे ,नांदेड,सातारा,पालघर व बीड या जिल्ह्यातून 550 नामांकित खेळाडूंनी सहभाग नोंदीला होता.
या स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील व किनवट तालुक्यातील अंबाडी या गावच्या रहवासी असलेल्या खेळाडूंनी घवघवीत हे संपादन केले असून सौ नेहा वेंकटेश जाधव (पेरके ) यांनी महिला गटातून तर अक्षय गुणाजी पंडलवार या खेळाडूने पुरुष गटातून प्रथम क्रमांक पटकावून अजिंक्यपद प्राप्त केले आहे आयोजकाच्या वतीने त्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. बाबुराव खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहा आणि अक्षयने हे यश संपादन केले असून या यशाबद्दल आमदार भीमराव केराम ,अंबाडी ग्रामपंचायतचे सरपंच सौ शितल जाधव यांच्यासह सर्व स्तरातून यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे