फेसबुक वर फेक अकाउंट तयार करून मुलीचे आक्षेपाहार्य फोटो अपलोड करून तिची बदनामी व विनयभंग केल्याप्रकरणी किनवट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल व अटक
किनवट/प्रतिनिधी:
किनवट पोलीस स्टेशन येथे दिनांक 4 11 2023 रोजी यातील फिर्यादी वय 50 वर्ष राहणार शिवाजीनगर किनवट यांनी दिलेल्या तक्रारीवरून भादवि कलम 354 504 506 तसेच भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 इ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन डुकरे हे करीत आहेत.
सदर गुन्ह्यायातील अज्ञात आरोपी याने फिर्यादीची पीडित मुलगी हिचे खाजगी व आक्षेपाहार्य फोटो फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून अपलोड केले त्यामुळे यातील फिर्यादी व त्याचे कुटुंबांना विनाकारण मानसिक त्रास होऊन त्यांची बदनामी केली व फिर्यादीचे पीडित मुलीचा विनयभंग केला वगैरे मजकुराच्या तक्रारीवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपास कामी सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथील पोलीस उपनिरीक्षक दळवी साहेब तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास राठोड यांचे मदतीने तांत्रिक तपास करून गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद आरिफ मोहम्मद आयुब चव्हाण राहणार शिवाजीनगर किनवट हा निष्पन्न झाल्याने त्यास गुन्ह्यासंदर्भात विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याला अटक करण्यात आली आहे.
तरी किनवट परिसरातील सर्व नागरिकांना पोलीस स्टेशन किनवट तर्फे आव्हान करण्यात येते की, अशाप्रकारे फेसबुक, इंस्टाग्राम व्हाट्स अँप या प्रकारच्या सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून महिलांची ,लहान मुलींची अथवा इतर कुणाचीही बदनामी केल्यास, त्यांचे आक्षेपार्य फोटो अपलोड केल्यास, जातीय- धार्मिक तेढ निर्माण केल्यास अथवा अफवा पसरविणारे मेसेज पाठवल्यास त्यांचे विरुद्ध सक्त कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
🙏🏻🙏🏻