तालुक्यातील १६ खाणपट्यातून बेकायदेशीररित्या मुरूमाचे उत्खनन* *इटीएस मशीनद्वारे मोजणीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी :संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.6.जिल्यातील धर्माबाद तालुक्यात १६ खाणपट्यातून मुरूम उत्खननाची परवानगी महसूल विभागाकडून घेऊन परवानगी पेक्षा जास्त मुरूमाचे उत्खनन मुरूम माफीयांकडून होत आहे.परवानगी ५०० ब्रासची असताना ५००० ब्रासपेक्षा उत्खनन झाले असताना स्थानिक महसूल विभाग या मुरूम उत्खननाची मोजणी इटीएस मशीनद्वारे करण्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
तालुक्यात सध्या रस्त्याची कामज मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कामी मुरूम लागत असल्याने तालुक्यातील १६ चिकना,सायखेड,जारीकोट,आटाळा,माष्टी,शेळगाव खाणपट्यातून मुरूम उत्खनन करण्यासाठी मुरूम असलेल्या शेतकऱ्यांची शेती तात्पुरत्या स्वरूपात शेतकऱ्यांना मावेजा देऊन गुत्तेदार मुरूमाचे उत्खनन करतात.तालुक्यातील १६ खाणपट्यातून सध्या मुरूमाचे उत्खनन करण्यासाठी महसूल विभागाने परवानगी दिली आहे.
मुरूमाचे ५०० ब्रास उत्खनन करण्याची परवानगी असताना गुत्तेदारांकडून मात्र परवानगी पेक्षा जास्त उत्खनन होत असुन वाहनामधून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतुकही जोमात सुरू असताना याकडे तहसीलच्या महसूल विभागाने मात्र दुर्लक्ष करीत आहे.
तालुक्यातील १६ खाणपट्यातून परवानगी पेक्षा जास्तीचे उत्खनन तसेच उत्खननासाठी दिलेला कालावधी संपुनही मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन व वाहतूक सुरू असल्याने शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या १६ खाणपट्याची इटीएस मशीनद्वारे मोजणी करण्याचे आदेश स्थानिक तहसील प्रशासनास देऊनही तहसील प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने तहसील प्रशासन व गुत्तेदाराकडून काय संबंध आहेत ? याबाबत गौडबंगाल कायम असून तालुक्यात सध्या याबाबत चर्चा होत आहे.
तसेच शहरातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय पाठीमागे व येळवत रोडवर वनविभागाची जमीन असलेल्या ठिकाणी रात्रीला अवैध मुरूमाचे उत्खनन होत याकडे कारवाई करण्यासाठी महसूल विभाग दुर्लक्ष करीत आहेत.
गोदावरी नदीपात्राशेजारी असलेल्या शेळगाव,माष्टी,आटाळा, बाभळी,चोंडी,चोळाखा,सुरजखोड या गावातील नदीकाठच्या शेतीत अवैध मातीचे उत्खनन होत असताना महसूल विभाग कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.