किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

इनामी जमिनीचे जाचक आदेश रद्द करून सामान्यांना न्याय द्यावा ●असदुल्लाबाद कृती समिती अध्यक्ष डॉ.विश्‍वास कदम यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.६.शहरातील असदुल्लाबाद येथील एकूण २८ सर्वे नंबर मधील इनामी ‘जमिनीच्या बाबतीत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले जाचक आदेश रद्द करून तेथील खरेदी विक्रीसाठी पुन्हा परवानगी द्यावी आणि सर्वसामान्यांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा यासाठी असदुल्लाबाद कृती समिती अध्यक्ष डॉ.विश्‍वास कदम यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत तरी हा लढा सर्व व्यापी व्हावा यासाठी या भागातील रहीवाशांनी एकत्रित यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी यांनी इनाम निर्मूलन कायद्यानुसार मौजे असदुल्लाबाद नांदेड येथील एकूण २८ सर्वे नंबर मधील जमीन इनामी म्हणून निर्मूलन झाले नसल्याचे जाहीर करून इनामी निर्मूलन कायद्याअंतर्गत नजराणा कर रक्कम भरल्याशिवाय खरेदी खताच्या आधारे खरेदीदाराचे नामांतर करण्यात येऊ नये, असे पत्रवजा आदेश काढले आहेत. त्यामुळे असदुल्लाबाद नांदेड येथील सदर सर्वे नंबरच्या व्यावहारीक वाटाघाटी पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत.

मागील पन्नास वर्षांपासून उपरोक्त सर्व सर्वे नंबरचा विकास झालेला आहे. विकासासाठी नांदेड महानगरपालिका आणि संबंधित विभागाने वेळोवेळी या भागात भरीव निधी देऊन कामेही केली आहेत.अशोकनगर,कैलासनगर, आनंदनगर,नाईकनगर या परिसरातील सोसायटीपासून विविध टोलेजंग इमारती अस्तित्वात आहेत.

परंतु,नांदेडच्या मुख्य वस्तीत असलेल्या असदुल्लाबाद येथे खरेदी- विक्री व्यवहार होत नसल्यामुळे तेथील मालमत्ताधारकांमध्ये भीतीचे वातावरण. निर्माण झाले असून अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश तात्काळ रद्द करावा,

‘अशी मागणी कृती समितीचे अध्यक्ष डॉ.विश्‍वास कदम यांनी निवेदनात केली आहे.
असदुल्लाबाद येथील संबंधित सर्वे नंबर मधील जागेचा विनापरवाना विकास होत असल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी शासनाने महसूल विभागाच्या कायदेशीर व्यक्तीची नियुक्ती केलेली आहे.

परंतु मागील पन्नास वर्षांत संबंधित व्यक्तींनी अशा कोणत्याही प्रकारचे आक्षेप घेतले नाही किंवा कारवाई प्रस्तावित केली नाही. आजवरच्या कोणत्याही अधिकाऱ्याने तत्कालीन विकास कामाला निर्बंध घातले नाहीत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात इमारती व व्यावसायिक व्यापारपेठ उभी राहिली आहे.

आता पन्नास वर्षांनंतर या इनामी जागेबाबत जाचक आदेश काढण्यात आला आहेत. या भागातील नागरिकांना जर भोगवटदार बदलून तो जमीन स्वतः कडे ठेवायची असेल तर त्यांना चालू बाजारभावाप्रमाणे शासनाकडे ७५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

त्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी आर्थिक आणि मानसिक कोंडी होते आहे. या सर्व बाबीकडे व्यक्तिशः लक्ष घालून असदुल्लाबादमधील एकूण सर्वे २८ मधील सर्व नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा. तेथील खरेदी विक्री पुन्हा सुरू करण्यासाठी स्वतः लक्ष घालून प्रयत्न करावेत, यासाठी असदुल्लाबाद कृती समिती अध्यक्ष डॉ.विश्‍वास कदम यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत ..

कृती समिती स्थापन करून या यासाठीचा लढा..

वरील सर्व २८ सर्वे नंबर मधील रहीवाशांना एकत्र करत या भागातील नागरीकांची कृती स्थापन करून याकामी जनजागृतीबरोबरच ईनामी जमीनीबाबतचे जाचक आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्नशिल आहोत तरी प्रशासनानेही याबाबतीत तातडीने निर्णय देऊन रहीवाशांना दिलासा द्यावा ही विनंती ..तसेच कृती समितीत सहभागी होण्यासाठी नागरीकांनी आपल्याशी संपर्क साधावा असे त्यांनी केले आहे..

डॉ.विश्‍वास कदम , अध्यक्ष, असदुल्लाबाद कृती समिती, नांदेड

158 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.