किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

बायो सीएनजी प्रकल्पाचे नितिन गडकरीनां निमंत्रण.

किनवट:(तालूका प्रतिनिधी)
जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनी किनवटच्या संचालकांनी बायो सीएनजी प्रकल्प उभारणी संदर्भात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली असून प्रकल्पाचे निमंत्रण गडकरीनां दिल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. .
जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनी ने नुकतेच 10 हजार सभासद नोंदणी केले आहे. राजगड येथे गवतापासून सीएनजी व सेंद्रिय खत तयार करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळतील विनायक गव्हाणे,चंपतराव जाधव, बाळकृष्ण कदम व गौरव नेम्मानीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बायो सीएनजी व सेंद्रिय खत प्रकल्पाची माहिती विचारली व प्रकल्प उभारणीच्या निमंत्रणास सकारात्मक प्रतिसाद दिला.
दगड, माती, लोखंड व काच सोडून सर्वांपासून तयार होणारा बायो सिएनजी देशासाठी व शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असुन या प्रकल्प उभारणीच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गवतापासून सीएनजी तयार होणार हा प्रकल लकरच राजगड येथे उभारण्यात येणार आहे. यासाठी एमसीएल कंपनीचे पुर्ण सहकार्य मिळणार आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण असल्याचे जाणकारांचे मत आहे. किनवट तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरणार आहे.

126 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.