ऐतिहासिक भारत जोडो यात्रा यशस्वी करून भारत यात्री डॉ. श्रावण रॅपनवाड यांचे नांदेड रेल्वे स्थानकावर उत्स्फूर्त स्वागत.
नांदेड. दि.२.(प्रतिनिधि)
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचा शुभारंभ कन्याकुमारी पासून करण्यात आला होता. आणि या भारत
जोडो यात्रेचा समारोप दि.३० जानेवारी रोजी कश्मीर येथे संपन्न झाला. या भारत जोडो अभियानामध्ये नांदेड चे भूमिपुत्र भारत यात्री म्हणून
डॉ. श्रावण रॅपनवाड हे सहभागी झाले होते. त्यांनी १४७ दिवसात जवळपास चार हजार किलोमीटर पायी चालून खा. राहुल गांधी यांच्या समवेत ही भारत जोडो यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली. आज दिनांक ०२.०२.२३ गुरुवार रोजी दुपारी २.३५ वा. सचखंड एक्सप्रेसने त्यांचे नांदेड येथे आगमन होताच नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी तर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष गोविंदराव शिंदे पाटील नागेलीकर, जि.प.चे माजी.अध्यक्ष दिलिपराव पाटील बेटमोगरेकर, मुखेड ता.काँगेस अध्यक्ष राजीव पा.रावणगांवकर,जिल्हा प्रवक्ते दिलिप कोडगिरे,शहराध्यक्ष नंदकूमार मडगुलवार, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव ॲड. सुरेंद्र घोडजकर, नारायण श्रीमनवार, ॲड. जे. पी. पाटील, माजी सभापती लक्ष्मणराव जाधव. विजय देवडे, प्रल्हाद सोळंके,
मा.जि.प. प्र.संतोष बोनलेवाड,
रामेश्वर पाटील इंगोले,संभाजी पा.भीलवंडे,ऊमाकांत पवार,बालाजी वाडेकर,पत्रकार रियाज शेख,विश्वनाथराव कोलमकर,बबलु मूल्ला,अदनान पाशा,ईम्रान पाशा, अरुणा पुरी, नवीन राठोड, प्रमोद भुरेवार, अशोक एडके, प्रा.शशिकांत हाटकर, एन एस यू आय जिल्हाध्यक्ष शशिकांत
क्षिरसागर, सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष इंजि.हरजिंदर सिंघ संधू, मुनवर शेख,संजय वडजे, सादिक मर्खेलकर, शिवराज कांबळे, शिवाजीराव देशमुख
बरबडेकर, अशोक कासेवाड, शेरखान पठाण, शाहूराज गायकवाड,
रमेश तालीमकर,आदित्य देवडे,
यांच्यासह डॉ. रॅपनवाड यांचं कुटुंब, नातेवाईक, मित्र मंडळ
यांनी भव्य पुष्पहार घालून व पुष्पगूच्छ देवून स्वागत केले. या वेळी राहूल गांधी,अशोकराव चव्हाण साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, काॅंग्रेस पक्षाचा विजय असो,अशा अनेक घोषणांनी अवघे नांदेड रेल्वे स्टेशन दणाणुन गेले होते.डाॅ.श्रावण रॅपनवाड यांचे त्यांच्या सूवीद्य पत्नी डाॅ. सौ.दिपाली ताई रॅपनवाड व त्यांच्या सहकारी महिलांनी त्यांचे ओवाळून औक्षण केले. व महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे
भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.