टिंगणवाडी रोडवर अवैध सागी माल जप्त
किनवट/प्रतिनिधी: दिनांक 9 /12/ 2023 रोजी गुप्त माहितीवरून किनवट टिंगनवाडी रोडवर रात्रीची गस्त करत असतांना संशयावरून विना नंबर च्या इंडिका वाहनाचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता वाहन सोडून आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.कारजवळ जाऊन इंडिका कारची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध गोल सागी नग-19 आढळून आले.
हया कार्यवाहीत मा. उपवनसंरक्षक नांदेड श्री.वाबळे साहेब मा.सहाय्यक वनसंरक्षक श्री.जी.डी.गिरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःमा.वनपरिक्षेत्र अधिकारी(प्रा.)किनवट श्री.पी.एल.राठोड साहेब,वनपरिमंडळ अधिकारी चिखली (बू.)श्री.एम.एन.कतुलवार श्री.एस.एम.कोम्पलवार वनरक्षक श्री.रवी दांडेगावकर श्री.अनिल फोले वनमजूर श्री नूर मामू तसेच कर्तव्यदक्ष वाहन चालक श्री. बाळकृष्ण आवले यांचा या कार्यवाहीत सक्रिय सहभाग होता.जप्त केलेल्या अवैध सागी मालाचा तपशील खालील प्रमाणे नग संख्या-19 घ मी.0.691 माल किंमत 14580=00रुपये कार किंमत 40000=00 रुपये जप्त केलेला एकूण मुद्देमाल 54580=00रुपयाचा आहे.