श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज यांच्या साहिबजादे यांना समर्पित गुरुद्वारा तख्त सचखंड साहिब मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.१०.तख्त सचखंड श्री हजूर अविचलनगर साहिब येथे यावर्षी ही श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज यांचे साहिबजादे यांच्या बलिदानास समर्पित दि.25 आणि 26 डिसेंबर 2023 रोजी माननिय पंज प्यारे साहिबान यांच्या सरप्रस्ती मध्ये ‘विशेष समागम’ चे आयोजन करण्यात आले आहे.
ज्यामध्ये खुली निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ज्याचे विषय ‘सरहिंद की गौरव गाथा’ व ‘चार साहिबजादों के जीवन से महान प्रेरणा’ या विषयावर आपले निबंध हिन्दी किंवा मराठी भाषेमध्ये 1000 शब्दांमध्ये दि.15 डिसेंबर 2023 पर्यंत मुख्याध्यापक-खालसा हायस्कुल मो.क्र. 9421765761 किंवा प्राचार्य गुरुवचन सिंघ मो क्र. 9423441585 यांच्याकडे कार्यालयीन वेळेत सादर करावेत दि.25 डिसेंबर 2023 रोजी खालसा हायस्कुल येथून सचखंड श्री हजूर साहिब पर्यंत शालेय विद्यार्थ्यांची ‘विशेष सद्भावना रैली’ चे आयोजन करण्यात आले आहे तसेच 26 डिसेंबर 2023 रोजी ‘सद्भावना दौड’ मैराथान रैलीचे ही आयोजन करण्यात आले ज्यांची नोंदणी 20 डिसेंबर 2023 पर्यंत (http://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfOZjhOwCpRRjW4cDVbzhOGe-bytsS_Vliik7ajgbKaaYOZNQ/ viewform) या साईट वर सदभावना दौड मैराथान रैली अथवा लेखी स्वरुपात आपले अर्ज प्रिंसीपल गुरुवचन सिंघ मो.क्र. 9423441585 यांच्याकडे कार्यालयीन वेळेत सादर करावेत.दि. 25 आणि 26 डिसेंबर 2023 रोजी तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे श्री अखंडपाठ कॅवीनच्या बाजू वरील परिक्रमेमध्ये ‘विशेष गुरमत समागम’ चे आयोजन करण्यात आले आहे.
ज्यामध्ये सिख पंथाचे प्रसिध्द रागी-प्रचारक ग्यानी विशाल सिंघजी (अमृतसर),भाई चरणजीत सिंघजी हीरा(दिल्ली) व वीवी सिमरन कौरजी (दिल्ली) यांचे कथा-किर्तन होईल व दि. 28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10:45 ते 11:00 पर्यंत ‘वाहिगुरु’ मंत्र चे पठन करुन सर्वातर्फे साहिबजादे यांना श्रध्दा भेट करण्यात येईल.या कार्यक्रमासाठी गुरुद्वारा सचखंड वोर्डचे माननिय प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघ जी IAS(R) यांनी गुरुद्वारा बोर्डाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन या सर्व कार्यक्रमासाठी आवश्यक ती तैयारी करावी जेणे करुन हा कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये याची दक्षता घेण्यात यावी व जिल्हा प्रशासनाचेही सहकार्य घेण्यात यावे असे निर्देश जारी केले.अशी माहिती अधिक्षक
गुरुद्वारा सचखंड बोर्ड,नांदेड,यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना दिली आहे.