जवाब दो आंदोलना पुर्वी आरक्षणाचे वर्गीकरण व आर्टी ची निर्मीती या प्रमुख मागण्या सरकारने मंजुरीची घोषणा करावी
नांदेड /प्रतिनिधी:
अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समन्वय समिती, म.रा.व जवाब दो आंदोलन वाहक यानी अवाहन केल्यानुसार काल दिनांक: 15 फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत साहेब यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,म.रा.याना सतिश कावडे, संस्थापक- अध्यक्ष, अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन, म.रा.यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.
मा.जिल्हाधिकारी, नांदेड याना काल निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलना चे राज्यउपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार,राज्यसचिव शिवाजी नुरूंदे,नुतन जिल्हाध्यक्ष रमेश सूर्यवंशी डोणगावकर,समन्वयक प्रा.व्यंकट सूर्यवंशी, माजी सरपंच शंकरराव गायकवाड, उत्तमराव वाघमारे, शिवाजी सोनटक्के, मातंग युवा जोडो अभियान समन्वय समिती चे आकाश सोनटक्के, प्रमोद भिसे,सुरेश सुर्यवंशी,सचिन सुर्यवंशी,संजय वाघमारे, पिराजी गायकवाड,गजानन गायकवाड, बालाजी भोसले पाटील वाघीकर,गंगाधर खुणे,आणि लहुजी शक्ती सेनेचे कोअर कमिटी अध्यक्ष संतोषभाऊ सुर्यवंशी आदींचा प्रमुख सहभाग होता