माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कुटुंबासह घेतले काळेश्वर चे दर्शन.
नांदेड.दि.१८.(प्रतिनिधी.)
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी आज महाशिवरात्रीनिमित्त दिनांक १८. ०२.२०२३ रोजी शनिवारी सकाळी विष्णुपुरी येथील तीर्थक्षेत्र श्री.काळेश्वर मंदिर येथे सहकुटुंब जाऊन. श्री. महादेवाचे दर्शन घेतले व महादेवाच्या पिंडीची विधिवत पूजा व आरती केली. तसेच भोकरच्या माजी आमदार सौ. अमिता भाभी चव्हाण, श्रीजया ताई चव्हाण, माजी मंत्री डी.पी.सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.आ. अमरनाथ राजूरकर, यांनी देखील श्री महादेवाचे दर्शन केले.
यावेळी श्री. काळेश्वर मंदिर संस्थांचे अध्यक्ष माजी मंत्री, मा.खा. भास्करराव पाटील खतगावकर, सौ.मीनल ताई खतगावकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे, धारोजी हंबर्डे, यांच्यासह इतर संस्थांन पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा शाल, श्रीफळ, व पुष्पहार, घालून सत्कार केला. यावेळी महाशिवरात्रीनिमित्त अनेक शिवभक्तांनी सकाळपासूनच श्री. तीर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी रांग लावली होती