किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

नांदेडच्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालय परिसरातील डुकराच्या कळपाने रुग्णावर हल्ला करून 35 वर्षीय रुग्णाचे लचके तुडल्यामुळे मृत्यू

*रुग्णालय पुन्हा चर्चेचा विषय ठरला*

*रुग्णालय प्रशासनाचा नकर्ते पणा पुनः उघड*

*सावरसावर करण्यात प्रशाशन आघाडीवर*

*सुरक्षा यंत्रणा ठरली कूचकमी*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.११.शहरातील विष्णुपुरी येथील कै.डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरामध्ये डुकरांच्या कळपाने रुग्णाचे लचके तोडल्याने यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. मयत हा नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील रहिवासी होता.

नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालय मागील काही दिवसापूर्वी चांगलेच चर्चेत आले होते. 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ताजे असतानाच व हे प्रकरण तपासावर असताना पुन्हा एकदा या ठिकाणच्या एका रुग्णाचे डुकरांनी लचके तोडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील तुकाराम नागोराव कसबे (वय 35) हा क्षयरोगाने त्रस्त असल्याने त्याला नातेवाईकांनी दाखल केले होते. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर नऊ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून त्याची सुटका झाली आणि तो घरी गेला.परत 10 नोव्हेंबर रोजी परभणी येथील काकाकडे जाण्यासाठी तो दुपारी साडेबाराच्या सुमारास नांदेडच्या रेल्वे स्थानकावर त्याचे वडील नागोराव कसबे यांनी त्याला सोडले. परंतु तो परभणीला न जाता अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने परत विष्णुपुरीचे रुग्णालय गाठले.तेथील नातेवाईकांना वाटप करण्यात येणारे मोफत जेवण घेऊन रुग्णालय परिसरातील चिंचेच्या झाडाखाली तो झोपला.रात्रीच्या वेळी डुकरांच्या कळपाने त्याचे लचके तोडले. यात त्याच्या कमरेखालचा भाग, नाक, गाल तोडून काढले आणि यातच त्याचा मृत्यू झाला.ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने धावाधाव करत मृतदेह ताब्यात घेतला. तोपर्यंत नांदेड ग्रामीण पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले.ही माहिती मयताचे वडील नागोराव कसबे आणि नातेवाईकांना समजताच त्यांनीही धाव घेतली. या घटनेमुळे पुन्हा एकदा नांदेडचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चर्चेत आले आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

“विष्णुपुरी रुग्णालयाबाबत ती बातमी चुकीची.शव विच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू अगोदरच झालेला. जखमा नंतर झाल्या.त्या रुग्णाला दोन दिवस अगोदरच सुट्टी देण्यात आली होती हे स्पष्ट”.
प्रभारी अधिष्ठाता डॉ एस आर वाकोडे

111 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.